पनवेल दि.२६: उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, (DY RTO) पेण- रायगड यांच्यामार्फत व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय रायगड व आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, नवीन पनवेल यांच्या मदतीने 23 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट मुंबई गोवा हायवेवरून खारपाडा टोल नाका येथे प्रवास करणाऱ्या प्रवासी बस चालक यांच्या नेत्र व आरोग्य तपासणीसाठीच्या शिबिराची सुरुवात झाली असून यामध्ये सकाळी 10:00 ते सायं 5:00 पर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
मुख्यतः रात्री उशिरा चालणाऱ्या प्रवासी वाहन चालकांसाठी पुढील 26 ते 28 ऑगस्ट, सायं 6:00 ते रात्री 12:00 वाजेपर्यंत तपासणीचे आयोजन केले गेले असून
यामध्ये ज्या चालकांचे डोळ्यांना चष्मा असणे गरजेचे आहे अशा चालकांना मोफत चष्मा दिला जाणार आहे.
काल पर्यंत एकूण तपासणी केलेले प्रवासी चालक 584 इतके असून त्यात सुस्थितीत 269 चालक आढळले. 195 जणांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले.
114 चालकांना पुढील तपासणीसाठीचा सल्ला देण्यात आला आहे. यामध्ये रेटीना:07, कॉर्निया:15, मोतीबिंदू:37, कलर व्हिजन:11, कंजेक्टिव्हिटीज : 02 यांचा समावेश आहे. अधिक माहिती साठी मोवानि शशिकांत तिरसे: 9975049900 यांच्याशी संपर्क साधावा असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण-रायगड यांचे कडून सांगण्यात आले आहे.