पनवेल दि.२१: भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रमांच्या अनुषंगाने राज्यात दिनांक १४ ते १६ एप्रिल रात्री १२ वाजेपर्यंत कार्यक्रम आयोजित करण्यासाठी शासनाने विशेष परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात औचित्याच्या मुद्याद्वारे शासनाकडे केली.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात औचित्याचा मुद्दा मांडताना म्हंटले कि, येत्या १४ एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती आहे. शिंदे- फडणवीस सरकार या राज्यामध्ये आले, तेव्हापासून अनेक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होत आहेत. १४ एप्रिल रोजी अनेक आंबेडकरी अनुयायी सामाजिक, शैक्षणिक अशा सर्व पद्धतीच्या कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. यंदा १४ एप्रिलला शुक्रवार तर १५ एप्रिल शनिवार आणि १६ तारखेला रविवार येत आहे. जयंती उत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असते, त्यामुळे सर्व अनुयायांची या तीनही दिवस कार्यक्रमांसाठी रात्री १२ वाजेपर्यंत परवानगीची मागणी आहे, त्या अनुषंगाने दिनांक १४ ते १६ एप्रिल पर्यंत रात्री १२ वाजेपर्यंत राज्यात शासनाने विशेष परवानगी द्यावी, आणि त्या संदर्भात शासनाने घोषणा करावी, असेही या औचित्याच्या मुद्यावर बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!