पनवेल दि.१०: समाजामध्ये नवीन उद्योजक घडविणे, समाजातील पैसा समाजातच राहावा यासाठी प्रयत्न करणे, अधिकाधिक तरुणांनी फक्त नोकरीवर अवलंबून न राहता व्यवसायात उतरावे आणि त्यासाठी समाजामध्ये व्यावसायिक मानसिकता तयार करणे, व्यवसायासंबंधी प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेऊन नवीन उद्योजक घडविणे व त्यासाठी असणाऱ्या सरकारी योजनांची माहिती करून देणे, सहकारातून मोठे उद्योग तयार करणे इत्यादी अनेक संकल्प हातात घेऊन हाती घेत आगरी कोळी कराडी उद्योजक असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे.
गेली अनेक वर्षे उद्योगात धडपड करत असलेली मंडळी या मध्ये सामील झाली आहे. व्यावसायिक / उद्योजक का घडत नाहीत हे आम्ही जवळून पाहिला आणि अनुभवल आहे. समाजातील तरुणांना व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रात मार्गदर्शनाची, व्यवसायिक संधी ची आणि त्यासाठी उपयुक्त असलेल्या कौशल्यांची आणि भांडवल कसे उपलब्ध होईल या सर्वांची माहिती करून देणे आवश्यक आहे. आणि हेच शिवधनुष्य आगरी कोळी कराडी असोसिएशनने पेलण्याचे ठरवले आहे. आगरी कोळी कराडी समाजातील कोणताही व्यवसायिक किंवा नवउद्योजक यामध्ये सहभागी होऊ शकतो असे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे यांनी सांगितले.
या संकल्पनेला ‘कोविड काळात’ विशेष अमलात आणणे शक्य होत नव्हते. परंतु प्रयत्न सतत सुरू होते अखेर 5 डिसेंबर च्या पहिल्याच सभेत 45 उद्योजकांनी सहभाग घेतला. आणि तीनच दिवसात ही संख्या 65 वर गेली आहे.संघटनेचे उद्दिष्ट 2022 मध्ये पाचशे उद्योजक तयार करणे आणि 50000 लोकसंख्येचा ग्राहक मंच तयार करणे आहे. अशी अनेक ध्येय आगरी कोळी कराडी उद्योजक असोसिएशने ठेवली आहेत.
आपल्याला यामध्ये व्यावसायिक किंवा उद्योजक म्हणून सहभागी व्हायचं असेल तर जरूर पुढे दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा. आणि जर आपण उद्योजक व्यावसायिक नसाल परंतु आपल्या समाजातील तरुणांनी उद्योगात यावे, समाजातील उद्योग भरभराटीस यावे असे वाटत असेल तर आपण आगरी कोळी कराडी उद्योजक असोसिएशन च्या फेसबुक पेज ला जरूर लाईक करावे. आपण ग्राहक म्हणून सुद्धा या संघटनेत आपण सामील होऊ शकता ! चला तर मग उद्योजक घडवूया एका समृद्ध समाजाची निर्मिती करू या आणि आता नोकऱ्या देणारे होऊया असे आवाहन आगरी कोळी कराडी उद्योजक असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे आणि त्यांचा टीमने केले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!