रत्नागिरी दि.06 (सुनिल नलावडे) आज दुपारी कोकण रेल्वे मार्गावर कोविड 19 पार्सल ट्रेन रूळावर काम करणाऱ्या विद्युतीकरण कामाच्या ट्रॉलीला धडकली. येणारी पार्सल ट्रेन काम करणाऱ्या मजुरांना दिसताच त्यांनी ट्रॉली रूळावरच ठेवून पळून गेल्यामुळे ते बचावले असून या अपघातात रेल्वे इंजिनचे नुकसान होण्यावर निभावले. या घटनेमुळे हि कोकण रेल्वेची पार्सल गाडी तिन तास उशिरा धावली या अपघाताला रेल्वे विदयुतीकरणाचा ठेका घेतलेल्या कंपनीचा गलतानपणा जबाबदार असल्याचे सांगण्यात आले.
कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासी वाहतूक सेवा बंद आहे त्यामुळे या अपघाताचे गांर्भिय फारसे मोठे नसले तरी मार्गावर झालेला अपघात लक्षवेधी आहे. अत्यावश्यक साहित्य आंबा पार्सल व औषधे वाहून नेणारी हि पार्सल ट्रेन पाच तारखेला ओखा येथून सोडण्यात आली होती. दुपारी रत्नागिरी स्थानकावरून केरळच्या दिशेने चालली असताना दुपारी राजापुर ते वैभववाडी या स्थानका दरम्यान ती ट्रॉलीवर धडकली रेल्वे ड्रयव्हरने प्रसंगावधान राखत अपघात टाळण्यासाठी गाडी ब्रेक करण्याचा प्रयत्न केला अखेर गाडी रूळावरील ट्रॉलीला धडकली. या अपघाताची कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी हा अपघात किरकोळ असल्याचे सांगितले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!