पनवेल दि.३०: तुपगाव येथील श्री संत गोरोबा काका मंदिरात खादी ग्रामोद्योग मुंबई व कुंभार समाज सामाजिक संस्था जिल्हा रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने कुंभार काम प्रशिक्षण व इलेक्ट्रिक चाक वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
हा उपक्रम कुंभार समाज सामाजिक संस्था जिल्हा अध्यक्ष अनंत महाडकर व जिल्हा कार्यकारिणी सदस्य रामदास साळवी यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाला. कार्यक्रमास खादी ग्रामोद्योग मुंबईचे अधिकारी अरुण कुमार प्रमुख उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत कुंभार समाजातील २० लाभार्थ्यांची इलेक्ट्रिक चाकांसाठी निवड करण्यात आली आहे. प्रथम सर्व इलेक्ट्रिक चाकांचे पूजन करण्यात आले. या लाभार्थ्यांना इलेक्ट्रिक चाक वापरासंदर्भात १० दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना इलेक्ट्रिक चाकांचे वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय, यापूर्वी पार पडलेल्या ३० दिवसांच्या माती काम प्रशिक्षणातील लाभार्थ्यांना शासनाकडून प्राप्त प्रमाणपत्रांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात खादी ग्रामोद्योग मुंबईचे अरुण कुमार, ग्रामसेवक विश्वास वारे, कुंभार समाज रायगड जिल्हा अध्यक्ष अनंत महाडकर व जिल्हा सचिव रामदास साळवी यांनी इलेक्ट्रिक चाक योजनेविषयी माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास उमेश मळवी (दादाजी फाउंडेशन, नाशिक), वसंत महाराज कुंभार (रायगड भूषण), नंदकुमार चिरनेरकर (जिल्हा उपाध्यक्ष), रविंद्र कुंभार, रमेश दहिवलीकर (जिल्हा कार्याध्यक्ष), दिलीप साळवी (जिल्हा सचिव), मधुकर कुंभार (जिल्हा महासचिव), पनवेल तालुका अध्यक्ष बजरंग भागवत, भरत आपटेकर, राजेंद्र साळवी, वसंत कुंभार, प्रविण कुंभार, संजय शिर्के, सविता मांडलेकर, कांता नागावकर, स्वप्निल नागावकर, सिद्धेश कुंभार, प्रज्वल कुंभार (प्रशिक्षक), सचिन साळवी, सुखदेव सारवे, देवेंद्र कुंभार, यशवंत बिरवाडकर, उद्धव साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमास कुंभार समाजातील बांधव, भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे कुंभार समाजातील युवकांना स्वयंरोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार असून समाजाच्या आर्थिक सबलीकरणाला चालना मिळणार आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!