पनवेल दि.११: रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आणि पनवेल चेस असोसिएशनच्या वतीने रायगड जिल्हातील आठ/बारा वर्षाखालील बुद्धिबळ संघाची निवड करण्यासाठी कामोठे येथील इंडो स्कॉट ग्लोबल स्कूलमध्ये स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत पनवेल, उरण, पेण, खोपोली, कर्जत तालुक्यातील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
स्पर्धेचे उद्घाटन रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विलास म्हात्रे, रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाचे अध्यक्ष आल्हाद पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी पनवेल चेस असोसियशनचे अध्यक्ष गंभीर दांडेकर, सचिव सी.एन .पाटील, सद्स्य अँडव्होकेट राजेश खंडागळे, इंडो स्कॉट ग्लोबल स्कूलचे फाऊंडर डॉ. अजय श्रीवास्तव, ममता मॅडम, किरण प्रधान, नेहा सिंग, स्पोर्ट्सचे प्रशांत यादव उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी डॉ. अजय श्रीवास्तव यांनी मनोगत व्यक्त करताना रायगड जिल्हा व पनवेल चेस असोसिएशनने मुलांना खेळण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद दिले तसेच नियमित असे उपक्रम शाळेत राबवू असे आश्वासन दिले. विलास म्हात्रे यांनी लवकरच “चेस इन स्कूल ’’ रायगडमध्ये सुरू करून लहान मुलांमध्ये बुद्धिबळ खेळाची आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून राष्ट्रीय पंच अमित कदम, संगणकाचे काम श्रेयस पाटील राष्ट्रीय पंच सेच श्रेया पाटील व चंद्रशेखर पाटील यांनी काम पाहिले.
निवड झालेली आठ वर्षाखालील गटातील प्रत्येकी दोन मुले आणि मुली पुणे येथे १२ व १३ मार्च रोजी होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तर बारा वर्षाखालील गटातील दोन मुले आणि मुली नागपुर येथे १९ व २० मार्च रोजी होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रायगडचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
स्पर्धेचा निकाल :-
आठ वर्षाखालील मुलांच्या गटात- आरव राज-पनवेल (प्रथम), अद्वय ढेणे-पनवेल (द्वितीय ), आर . मुकील (तृतीय ) रेयान सिंग (चतुर्थ ).
आठ वर्षाखालील मुलींच्या गटात आरोही पाटील -उरण (प्रथम ) ,स्मिती शेडगे -उरण (द्वितीय ).सानवी कुर्बेट्टी (तृतीय)
बारा वर्षाखालील मुलांच्या गटात ई. अभिषेक-पनवेल (प्रथम ),श्राव्य गावंड -पनवेल (द्वितीय),शिवम श्रीवास्तव (तृतीय ),आरीव प्रभाकर (चतुर्थ ),अभिलाष यादव (पंचम )
बारा वर्षाखालील मुलींच्या गटात ज्ञानदा गुजराथी -कर्जत (प्रथम ), अनुष्का नेरकर -पनवेल (द्वितीय).सई इनामदार(तृतीय), जस्विता चित्तुरी (चतुर्थ)या सर्वांना ट्रॉफी व मेडल देऊन गौरविण्यात आले.सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.