पनवेल दि.२१: आर्या वनौषधी संस्थेच्या या उपक्रमास सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, अमरावती,रायगड येथील वृक्षप्रेमींनी उदंड प्रतिसाद दिला. झाडे लावून वृक्षतोडीमुळे निर्माण झालेला असमतोल काही अंशी दूर करण्याचा प्रयत्न व वृक्ष संवर्धनाचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने आर्या वनौषधी संस्थेच्या मार्फत हा उपक्रम अनेक वर्षापासून राबविला जातो.
सदर कार्यक्रमात आपटा या बहुगुणी वृक्षांची माहिती असलेली पत्रके वाटप करण्यात आली. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात संस्थेचे अध्यक्ष तथा आर्या प्रहरचे संपादक सुधीर पाटील यांनी आपटा या वृक्षाच्या औषधी गुणधर्माची माहिती दिली. आपटा वृक्ष मूत्रविकार, थायराईड, अतिसार, प्रमेह, पित्त,कफ आदी आजारावर खूपच उपयुक्त असल्याचे सुधीर पाटील यांनी सांगितले. सदर कार्यक्रमात वृक्षप्रेमींनी आपटा वृक्षाची तोड न करण्याचे व त्याच्या संरक्षणाची शपथ घेतली. सदर कार्यक्रमास आर्या पाटील, प्रदीप घरत, रविंद्र बुदर, डॉ.अशोक तांबेकर शिवदास चेचरे आदींचे अनमोल सहकार्य लाभले.

🛑Navi Mumbai Airport Flight Testing
🔸नवी मुंबई विमातनळावर उतरलं पहिलं विमान
🔹भारतीय वायुदलाच्या सी 295 विमानाचं यशस्वी लँडिंग

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!