पनवेल दि.४: मुख्यमंत्री आणि विधीमंडळाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाली आहे. त्याबद्दल पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष अनिल भगत, विधानसभा संयोजक व जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील व इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपच्यावतीने ढोलताशा, फटाक्यांची आतषबाजी आणि जयघोषात जल्लोष करण्यात आला. आज झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली आहे. उद्या (गुरूवारी) ५ डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम पाहणार आहेत.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!