अलिबाग, दि.28 : पनवेलमध्ये मागील चोवीस तासात कोविड बाधित रुग्ण संख्येत 3 ने वाढ झाली आहे .
त्यात कळंबोली L.I.G. कॉलनी येथील ३९ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती बृहन्मुंबई महानगरपालिका येथे सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे. सदर व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
दुसरी व्यक्ती नविन पनवेल सेक्टर ६ येथील ५१ वर्षीय व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती आर्मी रिटायर्ड आहे. सदर व्यक्तीला पॅनेसिया हॉस्पीटल, नविन पनवेल येथे गेल्यामुळे संक्रमण झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
तर तालुक्याच्या उलवे सेक्टर 10 बी येथील सायन हॉस्पिटलमध्ये काम करणारी एक महिला नर्स आज
संक्रमित झाली आहे.
जिल्हा प्रशासनाने दि. 01 मार्च ते 27 एप्रिल 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधी नागरिकांचा तपशिल कळविला आहे, तो पुढीलप्रमाणे-
जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या (01/03/2020 ते 27/04/2020) – 1 हजार 589, परदेश प्रवासावरुन परतल्यानंतर निरीक्षणाखाली असलेल्या परंतु 14 दिवसांचा incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या – 1 हजार 589, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात निरीक्षणाखाली असलेल्या नागरिकांची संख्या- 5 हजार 206, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात असलेल्या व घरामध्ये अलगीकरणात Home Quarantine ठेवलेल्या परंतु 14 दिवसांचा Incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या- 2 हजार 619, आज रोजी घरामध्ये अलगीकरण आत Home Quarantine असलेले नागरिक- 2 हजार 457, शासकीय अलगीकरण कक्षामध्ये Institutional Qurantion असलेले नागरिक- 49, मयत नागरिकांची संख्या (पनवेल मनपा-2, पोलादपूर-1) -3, कोविड-19 ने बाधित झालेले व उपचारानंतर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या (पनवेल मनपा-24, पनवेल ग्रामीण 5,श्रीवर्धन-3,उरण-2) एकूण 34.
सद्य:स्थितीत करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या-
(पनवेल मनपा-32, पनवेल ग्रामीण-5, उरण-2, श्रीवर्धन-2, कर्जत-1,पोलादपूर-1,खालापूर-1) एकूण 44 .
रुग्णालयात दाखल असलेल्या नागरिकांची संख्या व त्यांच्या तब्येतीची सद्य:स्थिती-
मुंबई फोर्टिज हॉस्पिटल मुलुंड- 3 (उत्तम), उपजिल्हा रुग्णालय पनवेल-25 (उत्तम), सेव्हन हिल्स रुग्णालय, मुंबई-2 (उत्तम), रिलायन्स रुग्णालय, नवी मुंबई-1 (उत्तम), जगजीवन रुग्णालय, मुंबई -1 (उत्तम), एम. जी. एम. रुग्णालय, कामोठे – 5 (उत्तम), वेदांत रुग्णालय ठाणे- 1 (उत्तम), फोर्टीज रुग्णालय, नवी मुंबई – 1 (उत्तम), हिंदू महासभा रुग्णालय-1 (उत्तम),भाभा रुग्णालय, मुंबई-1 (उत्तम),भाटिया रुग्णालय,मुंबई- 1 (उत्तम), राजावाडी रुग्णालय, मुंबई-1 (उत्तम), सायन रुग्णालय, मुंबई-1(उत्तम).
नागरिकांच्या SWAB तपासणीबाबत माहिती पुढीलप्रमाणे-
जिल्ह्यातून कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नागरिकांची संख्या- 752, कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणी केल्यानंतर SWAB Testing न करण्याचा निर्णय घेण्यात आलेल्या नागरिकांची संख्या- 36, SWAB तपासणी केलेल्या नागरिकांची संख्या- 716, तपासणीअंती ‘-’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या- 615, तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या- 20, आतापर्यंत जिल्हृयात तपासणी अंती ‘+’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या- 81, सद्यस्थितीत करोना ‘+’ ve असलेल्या नागरिकांची संख्या (Active Cases)- 44, ‘+’ ve रिपोर्ट असलेले उपचारानंतर ‘-’ ve रिपोर्ट आलेले नागरिक संख्या-34, मयत नागरिकांची संख्या- 03 (पनवेल मनपा-2, पोलादपूर-1 ).
दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत झालेली वाढ-3 (पनवेल मनपा – 2,पनवेल (ग्रा.) -1.
दिवसातील कोविड बाधित बरे झालेले रुग्ण – 4 (पनवेल मनपा -3, उरण- 1),
दिवसातील मृत पावलेले रुग्ण -0, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने कळविली आहे.