पनवेल दि.29: जिल्ह्यात एकूण कोविड बाधित रुग्ण संख्येत -११ ने वाढ झाली असून पनवेल मनपा -७, पनवेल (ग्रा.) १, कर्जत – २, महाड – १ अशी आकडेवारी आहे.
आजचे नविन रूग्ण :
१) आज कळंबोली सेक्टर-४ येथील ३३ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती वडाळा, मुंबई येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. सदर व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
२) कामोठे सेक्टर-७ येथील ५३ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे. सदर व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संक्रमण झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
३) खारघर सेक्टर-४ येथील ६७ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती जेष्ठ नागरिक असून उपजिल्हा रूग्णालय, पनवेल येथे अॅडमीट आहे. हया व्यक्तीचा मुलगा याअगोदरच कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आला असून तो दिनांक २४/०४/२०२० पासून उपजिल्हा रूग्णालय, पनवेल येथे उपचार घेत आहे. सदर व्यक्तीला मुलाकडूनच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
४) खारघर सेक्टर-४ येथील ३२ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती इस्टेट एजंट म्हणून काम करीत आहे.
सदर व्यक्तीचा भाऊ याअगोदरच कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आला असून तो दिनांक २४/०४/२०२० पासून उपजिल्हा रूग्णालय, पनवेल येथे उपचार घेत आहे. सदर व्यक्तीला त्याच्या भावाकडूनच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
५) खारघर सेक्टर-१२ येथील ३८ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती वडाळा, मुंबई येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. सदर व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
६) खारघर येथील १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती मित्र हॉस्पीटल, खारघर येथे X-ray टेक्नीशन म्हणून काम करीत आहे. ही व्यक्ती मुळची गोवंडी येथील असून कामानिमित्त गोवंडी ते खारघर असा प्रवास करीत होती. सदर व्यक्तीला प्रवासादरम्यान संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
७) कामोठे सेक्टर-२० येथील ३५ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे. सदर व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संक्रमण झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
