कळंबोली दि.०२: दोन वेळच्या जेवणासाठी काबाडकष्ट व घाम गाळणाऱ्या आदिवासी वाड्यापाड्यांवर सण उत्सव साजरा होतोच असे नाही. त्याला दीपावलीचा सण सुद्धा अपवाद ठरत नाही. आकाश कंदील आणि दिव्यांचा तर विषयच उरत नाही. आणि गोडधोडाचा सुगंध सुद्धा फारसा येत नाही. या पार्श्वभूमीवर माणुसकीच्या दृष्टिकोनातून संकल्प शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून करंजाडे येथील मोकरी आदिवासी वाडीवर सामाजिक दिवाळी साजरी केली. त्यांनी या माध्यमातून खऱ्या अर्थाने बांधिलकी जपत आदर्श वस्तूपाठ ठेवला. दीपोत्सवाने हा पाडा खऱ्या अर्थाने प्रकाशात न्हावून गेला.
पनवेल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच टेकऑफ करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांचे उपस्थितीमध्ये आचारसंहितेच्या अगोदर लष्कराच्या विमानाचे लँडिंग आणि उड्डाण सुद्धा झाले.
आजूबाजूला टोलेजंग इमारती उभ्या राहिला आहेत. असे असले तरी आजही आदिवासी वाड्या-पाड्यांवर विकास पोहचला नाही. त्यांच्या एक प्रकारे पाचवीला पुंजलेल्या गरिबीचे समूळ उच्चाटन झाले नाही. अन्न वस्त्र निवारा या गरजा सुद्धा त्यांना पूर्ण करता येत नाहीत. शिक्षण आरोग्य या गोष्टी त्यांच्यासाठी दूरच आहेत. सण उत्सव आणि त्यांचा फारसा संबंध येत नाहीत. कारण रोजच्या जगण्यामध्ये संघर्ष शिवाय त्यांना दुसरे सोबती नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून संकल्प शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या संस्थापिका वैशाली जगदाळे यांनी
विमानतळापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या करंजाडे येथील मोकरी आदिवासी वाडीवर दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवारी येथील १५० कुटुंबांना फराळ वाटप करण्यात आले. त्याचबरोबर त्यांना रवा, मैदा आणि वनस्पती तूप देण्यात आले. मुलांसाठी बिस्किट सुद्धा नेण्यात आले होते. यावेळी करंजाडे चे सरपंच मंगेश शेलार,पल्लवी एरंडे,छाया भोसले, साक्षी ,अर्चना, नाथाभाई धारवाड, राज इंगळे, संकल्प जगदाळे उपस्थित होते.
दिव्यांनी आदिवासीवाडी तेजोमय !
संकल्प शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शेकडो दिवे मोकरी आदिवासी वाडीवर लावण्यात आले. शुभ दिपावली असा संदेश देत हा परिसर पूर्णपणे तेजोमय करण्यात आला. त्याचबरोबर या वाडीवर आकाश कंदील लावून आनंद अधिक उजळून निघाला. अनेक वर्षांपासून आम्ही या ठिकाणी वास्तव्यास आहे. परंतु यंदा दीपावलीचा सण साजरा करता आला अशी प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी दिली.

🔉वडाळे तलाव, पनवेल.
🎼आनंद गंधर्व पं.आनंद भाटे आणि सुप्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे यांचे सुमधुर गायन
🛑’सरकार हे जनतेचे सेवक असले पाहिजे’- महेंद्र घरत