अलिबाग, दि.9:- प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून मिळालेल्या पूर्व सूचनेच्या अनुषंगाने अरबी समुद्रात “बिपर जॉय” नावाचे चक्रीवादळ तयार झालेले असून या वादळामुळे दि. 9 ते 12 जून या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. तरी दि 9 ते 12 जून या कालावधीत मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जावू नये. तसेच जे मच्छिमार मासेमारीसाठी समुद्रात गेलेले असतील त्यांनी किनारी परत यावे. या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असून तसेच समुद्र किनारी वेगाने वारे वाहणार असल्याने नागरिकांनी तसेच पर्यटकांनी समुद्र किनारी (बिचेसवर) जाणे टाळावे, प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यात पर्जन्यमान विषयक व वाऱ्याच्या वेगाविषयक खालीलप्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहेत.
या कालावधीत जिल्ह्यातील पर्जन्यमान स्थिती पुढीलप्रमाणे : - दि.9 जून रोजी जिल्हयातील काही ठिकाणी वादळी वारा ( वाऱ्याचा वेग 30-40 कि.मी. प्रति तास) व विजांच्या गडगडाटासह पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. दि.10 जून रोजी जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वारा ( वाऱ्याचा वेग 30-40 कि.मी. प्रति तास) ढगांच्या गडगडाटासह पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. दि.11 जून रोजी जिल्हयातील काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचे पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. तर दि.12 जून रोजी जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचे पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे.
बिपरजॉय चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर दि. 9 जून रोजी कर्नाटक-गोवा महाराष्ट्र किनाऱ्याजवळ समुद्र खवळलेला राहणार आहे. काही ठिकाणी किमान 40 ते कमाल 60 किमी प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे. दि.10 जून रोजी अरबी समुद्र आणि गोवा-महाराष्ट्र किनाऱ्याजवळ आणि बाहेर 35-45 किमी प्रति तास वेगाने तर कमाल 55 किमी वारे वाहण्याची शक्यता आहे. दि.11 जून रोजी अरबी समुद्र आणि गोवा महाराष्ट्र किनाऱ्याजवळ आणि बाहेर 35-45 किमी प्रति तास वेगाने तर दि.12 जून रोजी कर्नाटक-गोवा महाराष्ट्र किनाऱ्याजवळ समुद्र खवळलेला राहणार आहे. आणि समुद्राजवळून 40-50 किमी तर कमाल 55 ते 60 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
तरी या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असल्याने नागरिकांनी समुद्रात जावू नये, पोहण्यासाठी समुद्रात उतरू नये, समुद्राच्या ठिकाणी सेल्फी काढू नये.कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी नागरिकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा :-
- जिल्हा नियंत्रण कक्ष-02141-222097
- जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष-02141-228473 टोल फ्री नं.112
- प्रादेशिक बंदर विभाग नियंत्रण कक्ष-02141-222746
तर जिल्ह्यातील ठिकाणी तालुका नियंत्रण कक्ष कार्यरत असून ते पुढीलप्रमाणे :
1.अलिबाग- 02141-222054, तहसिलदार विक्रम पाटील, मो.क्र.8879343401
- पेण-02143-252036, तहसिलदार, स्वप्नाली डोईफोडे, मो.क्र.9921873159
- मुरुड- 02144-274026, तहसिलदार, रोहन शिंदे, मो.क्र.8087243789
- पनवेल-022-27452399, तहसिलदार, विजय तळेकर, मो.क्र.9420919992
- उरण-022-27222352, तहसिलदार, उध्दव कदम, मो.क्र.8108504037
- कर्जत- 02148-222037, तहसिलदार, शितळ रसाळ, मो.क्र.8087513083
- खालापूर-02192-275048, तहसिलदार, आयुब तांबोली, मो.क्र.9975751076
- माणगाव- 02140-262632, तहसिलदार, विकास गारुडकर, मो.क्र. 9049929914
9.तळा- 02140-269317/7066069317, तहसिलदार,स्वाती पाटील, मो.क्र.9653448578
10.रोहा-02194-233222, तहसिलदार, डॉ.किशोर देशमुख, मो.क्र.9960248999
11.पाली-02142-242665, तहसिलदार, उत्तम कुंभार, मो.क्र.9422840625/9975655375
12.महाड-02145-222142, तहसिलदार, सुरेश काशिद, मो.क्र.9921332695/8180932485
13.पोलादपूर-02191-240026, तहसिलदार, समीर देसाई, मो.क्र.9673163479
14.म्हसळा-02149-232224, तहसिलदार, समीर घारे, मो.क्र.9503707370
15.श्रीवर्धन-02147-222226, तहसिलदार, महेंद्र वाकलकर, मो.क्र.7038754822
16.अधीक्षक माथेरान-02148-230294, दिक्षात देशपांडे, मो.क्र.8669056492
जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा , कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व अफवा पसरवू नये, कोणत्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्राकडून करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,रायगड डॉ. योगेश म्हसे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे .