अलिबाग दि. 23 :-स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 36,693 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे.

रायगड जिल्ह्यात आज 26 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि 613 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात 743 रुग्ण बरे झाले आहेत. मयत रुग्णांमध्ये  पनवेल तालुक्यातील 10, कर्जत, पेण, माणगाव व रोहा प्रत्येकी तीन, खालापूर दोन आणि महाड व पोलादपूर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल तालुक्यात 326, अलिबाग 68, पेण 58, रोहा 32, माणगाव 29, मुरूड 20, उरण व खालापूर प्रत्येकी 19, महाड 18, कर्जत 17, श्रीवर्धन व पोलादपूर दोन आणि तळा, सुधागड व म्हसळा तालुक्यात प्रत्येकी एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 43,079 आणि जिल्ह्यात 36,693 जण कोरोनामुक्त झाल्याने 5227 विद्यमान रुग्ण आहेत.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!