पनवेल दि.१३: आज पनवेल महापालिका क्षेत्रात 10, पनवेल ग्रामीणमध्ये 7 रुग्ण आढळून आले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठे 5, खारघर 3, नवीन पनवेल 1 आणि खांदा कॉलनी 1 असे एकूण 10 रुग्णांची नोंद झाली आहे. तर ग्रामीण पनवेलमध्ये उमरोली 5 आणि उलवे 2 असे एकूण 7 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
पनवेल शहर १० रूग्ण
कामोठे : ५
कामोठे, सेक्टर-१७, रिध्दी सिध्दी दर्शन सोसायटी येथील ३३ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर महिलेचे पती गोवंडी येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत असून ते याआधीच कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यांच्यापासूनच या महिलेला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.
कामोठे, सेक्टर-८, महावीर वास्तू येथील ४३ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती तालुका पोलिस स्टेशन, पनवेल येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. सदर व्यक्ती मारूतीधाम सोसायटी, कामोठे येथील नातेवाईकाच्या मेडिकल स्टोअर्समध्ये जात होती. सदर सोसायटीमध्ये याअगोदरच दोन व्यक्ती पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. त्यांच्या संपर्कात येऊनच या व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष
कामोठे, सेक्टर-६, अनंत वाटीका सोसायटी येथील ३५ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती नायगाव, मुंबई येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
कामोठे, सेक्टर-३४, मानसरोवर कॉम्प्लेक्स येथील ६१ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर महिलेच्या घरातील तीन व्यक्ती याअगोदरच कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या होत्या. त्यांच्या संपर्कात येऊनच या महिलेला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.
कामोठे, सेक्टर-१४, लेक व्हयुव अपार्टमेंट येथील ३३ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
खारघर : ३
खारघर, सेक्टर-२१, ज्ञानसाधना सोसायटी येथील ५३ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती बेस्ट डेपो, धारावी, मुंबई येथे बस कंडक्टर म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
खारघर, सेक्टर-८, भुमी हाईट्स येथील ५६ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती टाटा पॉवर, चेंबुर येथे अभियंता म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
खारघर, सेक्टर-१०, सेनसिटी सोसायटी येथील ५१ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती बँक ऑफ इंडिया, शाखा माजगाव येथे मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
नविन पनवेल : १
नविन पनवेल, सेक्टर-१५, गुलमोहर पार्क येथील ४५ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती वकिल म्हणून कार्यरत असून उमरोली, पनवेल येथील याआधीच कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेले त्यांचे जवळचे नातेवाईक यांच्या संपर्कात येऊनच त्यांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.
खांदा कॉलनी : १
खांदा कॉलनी, सेक्टर-७, व्हिजन सोसायटी येथील २९ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती घाटकोपर येथे फार्मासिस्ट म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
पनवेल ग्रामीण – 7
उमरोली: ५
ग्रीन रिव्हरसाईट हो.सोसा., येथील ३३ वर्षीय, ३२ वर्षीय, ५९ वर्षीय, ०५ वर्षीय, ७० वर्षीय आशा पाच याक्ती कोविड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य हे याधी कोविड-१९ पॉझिटिव्ह आलेले आहेत. सदर पाच व्यक्तीस त्यांच्या कुटुंबातील सदस्यमातून संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
उलवे : २
रेडियन स्पेल्सर, डी.सोसा., प्लॉट ६४ सेक्टर ५, बेधील ४२ वर्षीय व्यक्ती कोविक पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती ए.पी.एम.सी. मार्कट वाशी येथे व्यावसायीक आहे. सदर व्यक्तीस कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
उलवे, त्रिमुती रेसिडेन्सी, प्लॉट 107, सेक्टर २१,मधील ३२ वर्षीय व्यक्ती कोविड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती परक, मुंबई येथे बैंकेत कार्यरत आहे. सदर व्यक्तीस कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.