अलिबाग दि.१९: आज रायगड जिल्ह्यामध्ये एकूण पाच पॉझिटिव पेशंटची भर पडलेली असून त्यामध्ये पनवेल ग्रामीण मधील गावचा एक व्यक्ती तर श्रीवर्धनमधील चार व्यक्तींचे पॉझिटिव्ह अहवाल मिळाले आहेत.
विचुंबे गावातील व्यक्ती बीपीटी मध्ये ते कामाला होती बहुतेक येता-जाता प्रवासादरम्यान या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती पनवेलचे प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले यांनी दिली.
त्यामुळे करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पनवेल तालुक्यातील विचुंबे हद्दीतील पुष्प व्हॅली सोसायटी बी-विंग रूम नं. 207 विचुंबे व त्यापासून पूर्वेस प्रियंका पोळी भाजी केंद्र, दक्षिणेस स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा, विचुंबे, नैऋत्य-केरळ कॅफे, पश्चिमेस बळी मार्केट, उत्तरेस नदीची बाजू, ईशान्येस सिंडिकेट बँक परिसर व आजूबाजूच्या परिसरामध्ये पुढील 28 दिवस हे क्षेत्र Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आले आहे.
या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळविले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!