अलिबाग दि.१९: रायगडमध्ये ५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पनवेलमधील विचूंबे येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला तसेच श्रीवर्धन तालुक्यातील आणखी चार जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पनवेलचे प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले यांनी दिली आहे.
पोलादपूरच्या महिलेच्या मृत्यूने मृतांचा आकडा २ झाला असून आत्तापर्यंत रायगडच्या कोरोना रुग्णांची संख्या ४९ वर जाऊन पोहचली आहे.