पनवेल तसेच शेजारील तालुक्यात आज ५ नवीन रुग्ण आढळले असून शहरी भागात ३ तर ग्रामीण भागात २ नवीन रुग्ण आढळले आहेत.
शहरी भागात – कामोठे-१, खांदाकॉलनी-१, खारघर-१.
पनवेल दि.18: कामोठे येथील १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आढळून आली आहे. ती व्यक्ती ताज हॉटेलमध्ये शेफचे काम करत असून ताज हॉटेलमध्ये संक्रमित अन्य ८ व्यक्तींबरोबर यांचाही समावेश आहे. सध्या ती व्यक्ती नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोव्हिड-१९ रूग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
खांदा कॉलनी येथील ८४ वयाची १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली असून ती व्यक्ती किडनी व निमोनिया अशा दुर्दम्य आजारापासून गेल्या २ वर्षापासून ग्रस्त आहेत. त्यांना उपजिल्हा रूग्णालय, पनवेल येथे दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर आहे. परंतु पुढील उपचारासाठी त्यांना एम.जी. एम.रूग्णालय, कामोठे येथे स्थलांतरीत केले आहे.
खारघर येथील सेक्टर २० मधील १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती १७ मार्च २०२० पासून डी.वाय.पाटील हॉस्पीटल, नवी मुंबई येथे हृदय रोगावर उपचार घेत आहे.
ग्रामीण भागात – जासई-उरण-१, नेरे-पनवेल-१.
जासई-उरण येथील १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती रेल्वेमध्ये ट्रॅकमनचे काम करीत असून सद्यस्थितीत जगजीवन हॉस्पीटल, मुंबई येथे दाखल आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
नेरे-पनवेल १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आली असून ती व्यक्ती ओकार्ड हॉस्पीटल, मुंबई येथे लॅब टेक्नीशन आहे. ओकार्ड हॉस्पीटलने त्यांच्या सर्व टेक्नीशनच्या केलेल्या कोव्हिड-१९ च्या तपाणीमध्ये सदर व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आली होती.
आता सदर व्यक्ती पूर्णपणे बरी झाली असून त्यांना सेवन हिल्स हॉस्पीटलमध्ये Isolation मध्ये ठेवण्यात आलेले आहे.
आज नव्याने समाविष्ट ५ ही रूग्णांमध्ये कोणत्याही प्रकारे कम्युनिटी स्प्रेडिंग नसून संबंधितांना बहुतांशी हॉस्पीटलमध्ये संसर्ग झालेला असावा असा प्राथमिक निष्कर्ष आहे. संबंधित सर्व हॉस्पीटल यांना लेखी पत्राने कळवून दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे.
आता पर्यंत पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या ३४ वर गेली आहे.
coronavirus: पनवेल-उरणमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ !