पनवेल दि.19: कोविड -१९ या जागतिक समस्येला सर्व विश्वाला सामोरे जावे लागत आहे, या समस्येला तोंड देत असतांना त्यातून मार्ग शोधणे व यशस्वीतेकडे वाटचाल करणे, ही काळाची गरज आहे. आदर्श शैक्षणिक समूह संचलित, श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते काॅलेज ऑफ एज्युकेशन, नवीन पनवेल, हे महाविद्यालय अशाच पद्धतीने सध्या कार्यरत आहे… या काळात महाविद्यालयामार्फत अनेक कार्यक्रमांचे व वेबिनारचे आयोजन करण्यात आले, याचाच एक भाग म्हणजे बुधवार दि.१७ जून रोजी आयोजित करण्यात आलेला राष्ट्रीय परिसंवाद….
श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते काॅलेज ऑफ एज्युकेशन व बाबासाहेब डॉ.आंबेडकर टीचर्स असोसिएशन (BDATA) यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.
सकाळी ११.०० वाजता वेबिनारचे उदघाटन झाले. या कार्यक्रमासाठी धनराजजी विसपुते, चेअरमन, आदर्श शैक्षणिक समूह, डॉ.मनिषा कायंदे M.L.C. महाराष्ट्र राज्य प्रवक्ता शिवसेना, डॉ.संजय जगताप, उच्च शिक्षण सहसंचालक, कोकण विभाग, पनवेल, या कार्यक्रमाचे संयोजक डॉ.अविनाश शेंद्रे, अध्यक्ष, BDATA , डॉ.भटू वाघ, खजिनदार, BDATA , डॉ.सीमा कांबळे, प्राचार्या, श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेज आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
वेबिनारचा प्रारंभ स्वागत गीताने झाला, वेबिनारचे प्रास्ताविक BDATA चे अध्यक्ष डॉ.अविनाश शेंद्रे यांनी केले, यातून त्यांनी जागतिकीकरण व शिक्षण प्रणाली आणि सद्यस्थिती यावर भाष्य करत वेबिनार विषयी माहिती दिली… डॉ.सीमा कांबळे यांनी वेबिनरची उद्दिष्टे व महाविद्यालयाविषयी माहिती दिली. त्यानंतर वेबिनारचे प्रमुख अतिथी व आदर्श समूहाचे चेअरमनश धनराजजी विसपुते यांनी सद्य परिस्थिती वर भाष्य करत उच्च शिक्षण संस्थांच्या समस्या व उपाय यावर मार्गदर्शन केले…
प्रथम सत्रामध्ये वेबिनारच्या प्रमुख अतिथी व स्पीकर म्हणून उपस्थिती लाभलेल्या डॉ.मनिषा कायंदे यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये जी आव्हाने त्यावर कशा पद्धतीने उपाययोजना केली पाहिजे हे सांगत शासन, विद्यापीठ , संस्था व कर्मचारी या सर्वांच्या भूमिका स्पष्ट केल्या…
द्वितीय सत्रामधे डॉ.संजय जगताप यांनी उच्च शिक्षणामधील विविध आव्हाने, आपली शिक्षण प्रणाली व यानुसार घ्यावे लागणार शैक्षणिक निर्णय या विविध विषयांवर सर्वांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.
या नंतर सहभागीनी विचारलेल्या विविध प्रश्नांचे दोन्ही तज्ञांनी निरसन केले. डॉ.अरुण पाटील यांनी सर्वांचे आभार मानले व वंदे मातरम ने वेबिनारची सांगता झाली. सदर वेबिनारसाठी देशभरातून व परदेशातून १२०० हुन अधिक सदस्यांनी नोंदणी केली होती.