अलिबाग, दि.27 : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील आदई येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या मौजे आदई, ता.पनवेल येथील प्रयाग गॅलेक्सी को.ऑ.हौ.सो.बी विंग ही इमारत करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहे.
या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसचे भारतीय दंड संहिता अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळविले आहे.