कळंबोली दि.२० (दीपक घोसाळकर) : कळंबोली वसाहतीमध्ये लोकशाहीचा उत्सव हा उत्साह पूर्ण वातावरणात शांततेत पार पडला. यासाठी महसूल विभाग, पनवेल महापालिका प्रशासन, आणि पोलीस प्रशासनाने उत्तम कार्यपद्धती आखल्याने मतदान शांततेत व निर्वीघ्नपणे पार पडले. उमेदवारांचे भवितव्य हे ईव्हीएम मशीन मध्ये बंदिस्त झाले असून आता २३ तारखेच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. महापालिकेकडून मतदान केंद्राजवळ उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉइंट हे सर्वांचे लक्ष वेधी ठरले. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी मोबाईल मतदान केंद्रावर घेऊन जाण्याबाबत होणारी वादावादीला कायम पूर्णविराम दिला आहे .मतदान केंद्राच्या इमारतीमध्ये मोबाईल घेऊन जाऊ शकतो. मात्र मतदान केंद्रात जाण्यापूर्वी मोबाईल ठेवण्यासाठी प्लास्टिकचे लॉकर तैनात केल्याने मतदारांनी त्याचे खूप स्वागत करून पोलीस व महसूल प्रशासनाला धन्यवाद दिले आहेत. त्यामुळे मतदान केल्यानंतर सेल्फी काढण्याचा मोह कोणालाच आवरता आला नाही.
भारतीय लोकशाहीतील विधानसभेतील मतदानाचे पवित्र कार्य बुधवारी पार पडले आहे. मतदान निर्विघ्न सुरक्षित व आनंदाच्या वातावरणात पार पडले जावे यासाठी महसूल पोलीस महापालिका व सर्वच प्रशासन यंत्रणा ही चांगल्याच प्रकारे सज्ज झाली होती. कळंबोली मधील विविध शाळांतील १४ इमारतींमधून ७१ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. मतदान प्रक्रियेच्या वेळी अपंग मतदाराची व्यवस्था ही महसूल विभागाने चांगल्या प्रकारे केलेली होती. अपंगांना सहज पणे मतदान करता यावे यासाठी व्हीलचेरीची ही व्यवस्था मतदान केंद्रावर करण्यात आली होती. कळंबोली मध्ये पोलीस प्रशासनाकडून १५ अधिकारी, १०९ पोलीस अंमलदार आणि ४७ होमगार्डची व्यवस्था कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे आपत्कालीन व्यवस्थेसाठी रॅपिडक्शन फोर्सच्या कंपन्याही तैनात करण्यात आल्या होत्या. लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्याबाबत वादविवादाच्या प्रकार अनेक घडले .याची दक्षता पोलीस व महसूल प्रशासन यांनी मिळून आज घेण्यात आली होती. मतदान केंद्राच्या बूथ च्या बाहेर लॉकरची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे मतदान केंद्राच्या इमारतीमध्ये मतदाराला मोबाईल घेऊन जाऊ शकले. परंतु मतदान केंद्राच्या बाहेर लावण्यात आलेल्या प्लास्टिकच्या लॉकरमध्ये मोबाईल ठेवून त्याची चावी सोबत घेऊन मतदार मतदान केंद्रात गेले. त्यामुळे मतदान शांत निर्भिग्नपणे आणि सुरक्षितपणे पार पाडून झाल्यानंतर मतदारांनी त्यांचा मोबाईल काढून घेऊन गेले. त्यानंतर मतदान केल्यानंतर आपला सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. मोबाईल बाबत होणारी वादविवाद हे कायमचेच बंद झाल्याने मतदान एकंदरीत शांततेतच पार पडले. मोबाईल लॉकर मध्ये ठेवण्याबाबतचे सुंदर संकल्पना नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांच्या संकल्पनेमधून साकारण्यात आली होती. त्यामुळे मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यावरून होणारी वादविवादिच्या घटना ह्या कायमच्या दूर केल्या गेल्या. मतदान केंद्राच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा वरची ही नजर ही तैनात केली होती. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय पथक, आपत्कालीन परिस्थितीत असणारी महसूल विभागाकडून व्यवस्था ही मतदान केंद्रांवर तैनात केली होती. कळंबोली वसाहतीमध्ये ज्या केंद्रावर मतदान आहे. त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील दुकाने व १०० मीटर परिसरातील वाहतुकीचे रस्ते बॅरिकेट्स लावून सुरक्षेच्या कारणास्तव सकाळपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले होते. वसाहती मधील नवी सुधागड हायस्कूलमध्ये पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या संकल्पनेतून सेल्फी पॉइंट साकारण्यात आला होता . विठ्ठलाची प्रतिकृती असलेल्या मोठ्या बॅनरच्या खाली मतदान झाल्यानंतर सेल्फी काढण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्याच्या आजूबाजूच्या परिसरात संत महंताचे विचार समाजव्यवस्था कशी साकार हवी याबाबतची माहिती देणारे फलक लावण्यात आले होते. या सेल्फी पॉइंटवरून आलेल्या प्रत्येक मतदाराने व त्याच्या सोबतच्या नागरिकांनी सेल्फी काढून आपल्या संग्रहित ठेवण्याचा आनंद घेतला. या परिसरात लोकशाहीच्या उत्सवाच्या प्रतिबंधित करणारी मोठी रांगोळी ही साकारण्यात आली होती. सकाळी प्रथम आलेल्या नागरिकांचे मतदारांचे गुलाब पुष्प व तुळशीचे रोपटेतून पनवेल महापालिकेकडून स्वागतही करण्यात आले. मतदान केंद्राच्या सुरक्षेच्या सीमेपलीकडे विविध पक्षांच्या मतदार याद्यातील नावे शोधून देणे व स्लीपा वाटण्याचे काम करण्यासाठी बुथची व्यवस्था करण्यात आली होती. विविध राजकीय पक्षांचे जरी आमने-सामने बूथ असले तरी अत्यंत खेळीमळीच्या वातावरणात मतदानाचा लोकशाहीतील उत्सव हा पार पडला. शासनाकडून नेमण्यात आलेल्या विविध शाळांतील शिक्षक कर्मचारी जे बीएलओ चे काम करीत होते त्या बिएलोंची मतदान केंद्राच्या बाहेर कोणतीच बसण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यांना त्यांची व्यवस्था स्वतःच करावी लागली. त्यांना कोणतीही सुविधा निवडणुकी दरम्यान पुरविण्यात न आल्याने वर्षभर काम करणाऱ्या बीएलओनी नाराजी ही व्यक्त केली. मतदानाचा हक्क सर्वांनीच बजावावा यासाठी व्हीलचेअर मध्ये बसून आणून कर्तव्यदक्ष नागरिकांनी आपल्या आई-वडिलांना मतदाना केंद्रापर्यंत नेण्याची जबाबदारी पार पाडली. त्यामुळे लोकशाही मधील मतदान निर्भिड, शांत व सुरक्षितपणे पार पडल्याने प्रशासनानेही सुटकेच्या सुस्कारा सोडला कळंबोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उन्मेश थिटे यांनी कळंबोलीतील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.