पनवेल दि.७: सह दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक १, २, ३, ४ व ५ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला. या प्रसंगी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासोबतच रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमांनाही प्रोत्साहन देण्यात आले.
हा उपक्रम मुद्रांक जिल्हा वर्ग १ अधिकारी रायगड अलिबाग श्रीकांत सोनवणे साहेब तसेच सहदुय्यम निबंधक वर्ग २ चे नामदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर तसेच विधान परिषद आमदार विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले.
या प्रसंगी पनवेल १ चे सह दुय्यम निबंधक वर्ग २ सुनील लादे आणि पनवेल ५ चे सह दुय्यम निबंधक वर्ग २ माधवी कुंडल तसेच एडवोकेट मनोज भुजबळ, एडवोकेट मनोहर सचदेव, एडवोकेट अमोल साखरे ,एडवोकेट सागर वाणी उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला आणि समाजाप्रती आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली.
रक्तदान शिबिरासोबतच महाराष्ट्र शासनाच्या मुद्रांक चलनाच्या वापराबाबतचे निर्णय व इतर विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

🛑Silver Jubilee World Tour:🔹आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!