उरण दि.०१: उरणमधील डीपी वर्ल्ड या कंपनीच्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषदेच्या खोपटे येथील शाळेची नवीन इमारत बांधण्यात येत आहे. या इमारत बांधकामाचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आमदार महेश बालदी, न्हावा-शेवा टर्मिनल पोर्टचे डायरेक्टर व सीईओ जिबु के इट्टी, फ्री ट्रेड झोनचे सीईओ रंजित रे उपस्थित होते. या वेळी कॉन्ट्रॅक्टर व्ही. एस. पाटील यांचा विशेष सन्मान लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. इमारतीच्या बांधकामाची अंदाजे रक्कम पाच कोटी 10 लाख आहे. या कामासाठी सरपंच विशाखा ठाकूर व युवा नेते प्रशांत ठाकूर यांनी पाठपुरावा केला होता.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर आपल्या भाषणात म्हणाले की, या शाळेच्या माध्यमातून अनेक गुणवंत विद्यार्थी तयार व्हावेत. ते प्रत्येक क्षेत्रात चमकावेत यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज आहे. येथील नवीन इमारतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल. यासाठी मराठी माध्यमाबरोबरच इंग्रजी माध्यमातूनही येथे शिक्षण सुरू करावे. जेणेकरून काळाच्याबरोबर विद्यार्थ्यांना शिकता येईल. तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्वांनी आपापसातील मतभेद विसरून विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहनही केले.
नवीन इमारत कामासंदर्भात उरण पंचायत समिती, बांधपाडा ग्रुपग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, खोपटे ग्रामस्थ मंडळ यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे भाजपचे युवा नेते प्रशांत ठाकूर यांनी प्रास्तविकात सांगितले. तसेच सर्वांनी दिलेल्या योगदानाबद्दल सर्वांचे आभारही मानले.
या भूमिपूजन सोहळ्याला नगराध्यक्ष सायली म्हात्रे, भाजप तालुकाध्यक्ष रवी भोईर, नगरसेवक कौशिक शहा, राजू ठाकूर, पं. स. चे सभापती समिधा म्हात्रे, उपसभापती शुभांगी पाटील, जि. प. सदस्य बाजीराव परदेशी, पं. स. बीडीओ नीलम गाडे, बांधपाडाचे सरपंच विशाखा ठाकूर, गट शिक्षणाधिकारी के. बी. अंजने, खोपटे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील, पाणी कमिटीचे सभापती महेंद्र पाटील, शाळेचे सभापती रंजना पाटील, हायस्कूलचे चेअरमन राजन पाटील, डीपी वर्ल्डचे जावेद, आर्किटेक सुजित म्हात्रे, माजी जि. प. सदस्य विनोद म्हात्रे, जीवन गावंड, माजी पं. स. सदस्य रमाकांत पाटील, उद्योजक राजेंद्र पडते, रवी घरत, बांधपाडा ग्रुप ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ मंडळाचे सर्व सदस्य, हायस्कुल कमिटीचे सदस्य, खोपटेचे ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे निमंत्रक रा. जि. प. शाळा खोपटे, बांधपाडा ग्रुप ग्रामपंचायत, बांधपाडा ग्रामस्थ मंडळ व हायस्कूल कमिटी हे होते. सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार निवेदक नितेश पंडित यांनी मानले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!