अटल करंडक कोणाचा ?
पनवेलमध्ये रंगणार राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा महाअंतिम सोहळा !
पनवेल दि.२: श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या दोन दिवसीय महाअंतिम सोहळा शुक्रवार ३ जानेवारी पासून पनवेलमधील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. शुक्रवारी या महाअंतिम सोहळ्यात १२ तर शनिवारी ०८ एकांकिका सादर होणार आहेत. तसेच पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (दि. ०४ जानेवारी) सायंकाळी ०६ वाजता अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या दर्जेदार स्पर्धेचा नाट्यरसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष व सभागृहनेते परेश ठाकूर, प्रमुख कार्यवाह शामनाथ पुंडे, स्पर्धा सचिव डॉ. वसंत ब-हाटे यांनी केले आहे.
०३ जानेवारीला सादर होणाऱ्या एकांकिका
संस्था आणि एकांकिका
०१) वारली फिल्म्स अलिबाग – ‘स. न. वि. वि. ‘
०२) दिशा थिएटर्स आणि ओमकार प्रॉड. मुंबई – ‘अ बास्टर्ड पॅंट्रीऑट’
०३) राजश्री शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे – ‘पिंक इन द रेनबो’
०४) आमचे आम्ही पुणे – ‘रंगणाऱ्या माणसाचे रहस्य’
०५) अत्रेय अंबरनाथ – ‘चुरगळ’
०६) जिराफ थिएटर्स – ‘सुंदरी’
०७) एस. एम. प्रॉडक्शन, पुणे – ‘३७ गुण’
०८) महर्षी दयानंद महाविद्यालय, मुंबई – ‘ब्रह्मास्त्र’
०९) ज्ञानसाधना महाविद्यालय – ‘भोकरवाडीचा शड्डू’
१०) नाट्यमल्हार, अहमदनगर- ‘रंगबावरी’
११) श्रीमती काशिनाथ नवले महाविद्यालय, पुणे- ‘टॅंजंट’
१२) सीकेटी महाविद्यालय, पनवेल – ‘सेकंड हॅन्ड’

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!