अलिबाग, दि.10: मा.सर्वोच्च न्यायालयाने दि.04 मे 2022 रोजी दिलेल्या आदेशातील निर्णयानुसार आरक्षण ठरविण्याचा कार्यक्रम देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने मा.राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये नमूद केलेल्या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आला आहे.
त्यानुषंगाने जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग, महाड, माथेरान, मुरूड जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या आरक्षण व सोडतीवरील प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचना स्विकारण्यासाठी संबंधित नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे खालीलप्रमाणे आरक्षण सोडतीचे ठिकाण, वेळ तसेच आरक्षण व सोडतीवरील हरकती स्विकारण्याचे ठिकाण, वेळ निश्चित करण्यात आली आहे.
नगरपरिषदेचे नाव: खोपोली, आरक्षण सोडतीची कार्यवाही करणाऱ्या तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम- मुख्याधिकारी, खोपोली नगरपरिषद, आरक्षण सोडतीचा दिनांक व वेळ- सोमवार, दि.13 जून 2022, सकाळी 11.00 वाजेपासून, आरक्षण सोडतीचे तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण- खोपोली नगरपरिषद कार्यालय, ता.खालापूर, जि.रायगड, आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना मागविण्याचा दिनांक व वेळ- बुधवार, दि.15 जून 2022 ते मंगळवार, दि.21 जून 2022 पर्यंत, सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत.
नगरपरिषदेचे नाव: अलिबाग, आरक्षण सोडतीची कार्यवाही करणाऱ्या तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम- मुख्याधिकारी, अलिबाग नगरपरिषद, आरक्षण सोडतीचा दिनांक व वेळ- सोमवार, दि.13 जून 2022, सकाळी 11.00 वाजेपासून, आरक्षण सोडतीचे तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण- अलिबाग नगरपरिषद कार्यालय, ता.अलिबाग, जि.रायगड, आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना मागविण्याचा दिनांक व वेळ- बुधवार, दि.15 जून 2022 ते मंगळवार, दि.21 जून 2022 पर्यंत, सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत.
नगरपरिषदेचे नाव: महाड, आरक्षण सोडतीची कार्यवाही करणाऱ्या तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम- मुख्याधिकारी, महाड नगरपरिषद, आरक्षण सोडतीचा दिनांक व वेळ- सोमवार, दि.13 जून 2022, सकाळी 11.00 वाजेपासून, आरक्षण सोडतीचे तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण- महाड नगरपरिषद कार्यालय, ता.महाड, जि.रायगड, आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना मागविण्याचा दिनांक व वेळ- बुधवार, दि.15 जून 2022 ते मंगळवार, दि.21 जून 2022 पर्यंत, सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत.
नगरपरिषदेचे नाव: माथेरान, आरक्षण सोडतीची कार्यवाही करणाऱ्या तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम- मुख्याधिकारी, माथेरान नगरपरिषद, आरक्षण सोडतीचा दिनांक व वेळ- सोमवार, दि.13 जून 2022, सकाळी 11.00 वाजेपासून, आरक्षण सोडतीचे तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण- माथेरान नगरपरिषद कार्यालय, ता.कर्जत, जि.रायगड, आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना मागविण्याचा दिनांक व वेळ- बुधवार, दि.15 जून 2022 ते मंगळवार, दि.21 जून 2022 पर्यंत, सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत.
नगरपरिषदेचे नाव: मुरूड जंजिरा, आरक्षण सोडतीची कार्यवाही करणाऱ्या तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम- मुख्याधिकारी, मुरूड जंजिरा नगरपरिषद, आरक्षण सोडतीचा दिनांक व वेळ- सोमवार, दि.13 जून 2022, सकाळी 11.00 वाजेपासून, आरक्षण सोडतीचे तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण- मुरूड जंजिरा नगरपरिषद कार्यालय, ता.मुरूड, जि.रायगड, आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना मागविण्याचा दिनांक व वेळ- बुधवार, दि.15 जून 2022 ते मंगळवार, दि.21 जून 2022 पर्यंत, सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत.
नगरपरिषदेचे नाव: पेण, आरक्षण सोडतीची कार्यवाही करणाऱ्या तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम- मुख्याधिकारी, पेण नगरपरिषद, आरक्षण सोडतीचा दिनांक व वेळ- सोमवार, दि.13 जून 2022, सकाळी 11.00 वाजेपासून, आरक्षण सोडतीचे तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण- पेण नगरपरिषद कार्यालय, ता. पेण, जि.रायगड, आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना मागविण्याचा दिनांक व वेळ- बुधवार, दि.15 जून 2022 ते मंगळवार, दि.21 जून 2022 पर्यंत, सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत.
नगरपरिषदेचे नाव: रोहा, आरक्षण सोडतीची कार्यवाही करणाऱ्या तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम- मुख्याधिकारी, रोहा नगरपरिषद, आरक्षण सोडतीचा दिनांक व वेळ- सोमवार, दि.13 जून 2022, सकाळी 11.00 वाजेपासून, आरक्षण सोडतीचे तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण- रोहा नगरपरिषद कार्यालय, ता.रोहा, जि.रायगड, आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना मागविण्याचा दिनांक व वेळ- बुधवार, दि.15 जून 2022 ते मंगळवार, दि.21 जून 2022 पर्यंत, सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत.
नगरपरिषदेचे नाव: श्रीवर्धन, आरक्षण सोडतीची कार्यवाही करणाऱ्या तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम- मुख्याधिकारी, श्रीवर्धन नगरपरिषद, आरक्षण सोडतीचा दिनांक व वेळ- सोमवार, दि.13 जून 2022, सकाळी 11.00 वाजेपासून, आरक्षण सोडतीचे तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण- श्रीवर्धन नगरपरिषद कार्यालय, ता.श्रीवर्धन, जि.रायगड, आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना मागविण्याचा दिनांक व वेळ- बुधवार, दि.15 जून 2022 ते मंगळवार, दि.21 जून 2022 पर्यंत, सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत.
नगरपरिषदेचे नाव: उरण, आरक्षण सोडतीची कार्यवाही करणाऱ्या तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम- मुख्याधिकारी, उरण नगरपरिषद, आरक्षण सोडतीचा दिनांक व वेळ- सोमवार, दि.13 जून 2022, सकाळी 11.00 वाजेपासून, आरक्षण सोडतीचे तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण- उरण नगरपरिषद कार्यालय, ता.उरण, जि.रायगड, आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना मागविण्याचा दिनांक व वेळ- बुधवार, दि.15 जून 2022 ते मंगळवार, दि.21 जून 2022 पर्यंत, सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत.
तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी कळविले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!