उलवे, ता. १३ (कृष्णा पाटील): अहमदाबादमधील विमान अपघातात पनवेल तालुक्यातील न्हावा गावातील मैथिली मोरेश्वर पाटीलचा हिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
त्यामुळे न्हावा गावातील हवाई सुंदरी मैथिली मोरेश्वर पाटील हिच्या दु:खद निधनाने न्हावा गावावर शोककळा पसरली आहे.
आज महेंद्रशेठ घरत यांनी मैथिलीच्या कुटुंबीयांची न्हावा येथे जाऊन भेट घेतली. न्हावा गावावर पसरलेली शोककळा पाहून महेंद्रशेठ घरत यांनाही तीव्र दुःख झाले. सांत्वन करताना ते म्हणाले, “गुरुवारी विमान अपघाताची घडलेली घटना अतिशय वेदनादायक आहे. न्हावा गावची कन्या या दुर्दैवी अपघात निधन झाल्याचे समजताच गावात स्मशानशांतता पसरलीय. मीसुद्धा ही घटना समजताच अस्वस्थ आणि दुःखी आहे. केंद्र सरकारने यांची गंभीर दखल घ्यावी. मैथिलीच्या कुटुंबीयांच्या मागे मी कायम आहे.”
यावेळी न्हावा गावचे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे उपस्थित होते. त्यांच्या चुलत भाचीची ती मुलगी आहे. यावेळी न्हावा गावच्या माता-भगिनीही उपस्थित होत्या.