पनवेल, दि.7: 188 पनवेल विधानसभा निवडणूक 2024 चे लोकमुद्रा जनहित पार्टीचे उमेदवार कांतीलाल कडू यांच्या पक्षाचा शपथनामा मान्यवरांच्या उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आला आहे.
लोकमुद्रा जनहित पार्टीचे पक्षाध्यक्ष व उमेदवार कांतीलाल कडू हे यंदाची निवडणूक पनवेलसह महाराष्ट्राला विकासाचे पंख जोडण्यासाठी पनवेलकरांनी जनहितासाठी स्थापन केलेल्या नवा राजकीय पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवित असून त्यांची निशाणी सितार (वीणा) ही आहे. या पक्षाचा शपथनामा पत्रकार परिषदेद्वारे जाहीर करण्यात आला. यावेळी पक्षाध्यक्ष कांतीलाल कडू यांच्यासह डॉ.भक्तीकुमार दवे, डॉ.अमित दवे, विजय काळे, आनंदा पाटील, सुधीर सोमवंशी, मनस्वी गोवारी, अश्विनी भोसले, प्रसाद जाधव, डॉ.मुनीर तांबोळी यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी व्यासपिठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना पक्षाध्यक्ष कांतीलाल कडू यांनी सांगितले की, पनवेलचा विकास करण्यासाठी या पक्षाची स्थापना केली असून पनवेलमध्ये विकासकामे अतिशय संथगतीने सुरू असून माझ्यासमोर असलेले तिन्ही उमेदवार हे भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. शहरात खड्ड्यांचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, वाहतूक कोंडी, आरोग्याचा प्रश्न, औद्योगिक वसाहतीमधील प्रदुषणाचा प्रश्न, महिलांचे विविध प्रश्न, युवकांचे नोकर्यांचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न यासह अनेक अडचणी ठाकल्या असून या सर्व समस्या सोडविण्यासाठी या पक्षाची स्थापना केली त्या पक्षाच्या माध्यमातून ही निवडणूक लढवित आहे. तरी 5 क्रमांकाच्या वीणा (सितार) निशाणीसमोरील बटण दाबून मला विजयी करा, असे आवाहन त्यांनी पनवेलकरांनी केले आहे. तसेच त्यांनी 500 रुपयाच्या बाँण्ड पेपरवर सुद्धा प्रतिज्ञा पत्र सादर केले आहे.