मुंबई, 03: मुंबईतील आघाडीचे यशस्वी बांधकाम व्यावसायिक सुगी ग्रुप आणि समुद्र किनारा स्वच्छता आणि इतर पर्यावरण सुधारण्याचे उपक्रम हातीघेऊन पर्यावरणाच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेच्या संयुक्त विद्यमाने आज मुंबईच्या दादर समुद्रकिनारी ‘आमचे महासागर, आमची जबाबदारी’ हा किनारपट्टी स्वच्छता उपक्रम ‘दादर बीच क्लीन अप’ या नावाने आयोजित करण्यात आला. उपक्रमात प्लॅस्टिकच्या पिशव्या, गोण्या, एकेरी वापराच्या प्लास्टिकच्या वस्तू, टाकून दिलेले कपडे, दुधाच्या पिशव्या इत्यादी 2 टन घातक कचरा साफ केला. या स्वच्छता मोहिमेत 325 लोकांचा सहभाग होता.

आजच्या उपक्रमात दादर आणि मुंबईच्या इतर भागांतील स्थानिक नागरीक, निसर्गप्रेमी तरुण आणि पर्यावरण – जागरूक स्वयंसेवक आणि शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या लोकसहभागाच्या उपक्रमात सुगी ग्रुप चे कर्मचारी आणि सहयोगींनी देखील सक्रिय सहभाग घेतला.

सुगी ग्रुप गेल्या काही वर्षांपासून या किनारपट्टी स्वच्छताकार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेला मदत करत आहे. समुद्र प्रेमी आणि पर्यावरणवादी, जय शृंगारपुरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेच्या प्रयत्नातून युवक आणि किशोरवयीन मुलांमध्ये समुद्रकिनारे स्वच्छतेचे महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच त्यांनाशाश्वत जीवनाच्या विविध पैलूंवर शिक्षित करण्यासाठीविविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.

या उपक्रमाला कायम पाठिंबा देणाऱ्या सुगी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक निशांत देशमुख म्हणाले, “आम्हाला पुन्हा एकदा या दादर समुद्रकिनारा स्वच्छता उपक्रमाचा एक भाग होताना आनंद वाटत आहे. बांधकामव्यावसायिक असल्याने आम्ही शाश्वत व निरोगीजीवनासाठी आजूबाजूच्या स्वच्छ पर्यावरणावर भर देत आहोत. महासागर आणि जलस्रोत यांसह शहरी पायाभूत सुविधांच्या प्रत्येक घटकांचे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून चांगलेसंरक्षण व जतन करणे आवश्यक आहे. आम्ही महाराष्ट्रनवनिर्माण पर्यावरण सेनेच्या लोकसहभागाच्या याउपक्रमाला पाठिंबा देत आहोत, जे आमच्यासमुद्रकिनाऱ्यांच्या पर्यावरणाचे रक्षण करण्याबद्दल सामाजिकजागरूकता निर्माण करत आहे आणि याबाबत समानविचारांची भावना वृद्धिंगत करत आहे.”

समुद्रकिनारे स्वच्छता उपक्रमांद्वारे किनाऱ्यांचे संवर्धनकरण्याच्या आपल्या एकत्रित प्रयत्नांबद्दल बोलताना जय श्रृंगारपुरे म्हणाले, “आमच्या किनारपट्टी स्वच्छताअभियानाचे हे सहावे यशस्वी वर्ष आहे आणि दरवर्षीपर्यावरणाविषयी जागरूक लोकांचा या उपक्रमात सहभागवाढतो आहे, हे आशादायी चित्र आहे. महासागर आणिसमुद्रकिनारे यांची जागा अन्य कशानेही भरून काढणे शक्यनाही, त्यामुळे आपण त्यांचे संवर्धन केले पाहिजे. सुगी डेव्हलपर्स सारख्या संवेदनशील भागीदारांच्या सहयोगाने पर्यावरण संरक्षणाचा आमचा संकल्प बळकट झाल्याने आम्हाला आनंद वाटतो.”

ते पुढे म्हणाले, “सागरातील कचऱ्याचे ढिगारे आणि प्लास्टिक प्रदूषण यामुळे सागरी जीवसृष्टीला निर्माण होणारा धोका कमी करण्यासाठी समुद्रकिनारे स्वच्छ करणेमहत्त्वाचे आहे. आम्हाला तरुणांमध्ये याविषयी जबाबदारीची भावना जागृत करायची आहे. हे तरूण उद्याचे भविष्यअसून त्यांच्यासाठी किनारपट्ट्यांचे चांगले जतन करणेआवश्यक आहे.” आजपर्यंत, 10,000 हून अधिक स्वयंसेवकांनी या मोहिमेत भाग घेतला आहे आणि 450 हून अधिक किनाऱ्यांवरून 9,000 टनांहून अधिक प्लास्टिक आणि इतर कचरा या सर्व समुद्रकिनाऱ्यांवरून काढण्यास मदत केली आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!