पनवेल, दि.८: श्री स्वामी समर्थांचे अध्यात्मिक विचार, शिकवण आणि जीवनमूल्ये समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ‘सा. रायगड मनोगत’ या साप्ताहिकाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. अध्यात्माच्या माध्यमातून समाजाला सकारात्मक विचारांची दिशा देण्याचे काम साप्ताहिक करीत असून, त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन मठाधिपती सुधाकर (भाऊ) घरात यांनी केले. ‘सा. रायगड मनोगत’च्या दिवाळी विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
दिवाळीनिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या या विशेषांकात अध्यात्म, संस्कृती, सामाजिक विषय आणि वैचारिक लेखनाला स्थान देण्यात आले आहे. समाजातील विविध घडामोडी, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे आणि सकारात्मक विचार वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने अशा विशेषांकांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
यावेळी नगरसेवक अ‍ॅड. प्रथमेश सोमण, नगरसेविका आर्या प्रवीण जाधव, शिवसेना विभागप्रमुख प्रवीण जाधव, ‘सा. रायगड मनोगत’चे कार्यकारी संपादक संजय कदम, पनवेल महानगर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे, ज्येष्ठ पत्रकार दीपक महाडिक, ज्येष्ठ छायाचित्रकार भालचंद्र जुमलेदार, राजेश डांगळे, पत्रकार दिनेश गिल्डा आणि उद्योजक नानू वाघे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच स्वामी समर्थांचे भक्त आणि सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरसेवक अ‍ॅड. प्रथमेश सोमण यांनी आपल्या मनोगतात अध्यात्म, संस्कृती आणि सामाजिक जाणीव यांचा संगम साधणाऱ्या दिवाळी विशेषांकांमुळे वाचकांना वैचारिक समृद्धी मिळते, असे सांगितले. श्री स्वामी समर्थांच्या विचारांचा प्रसार आणि समाजप्रबोधनाचे कार्य ‘सा. रायगड मनोगत’च्या माध्यमातून यापुढेही अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी संपादकीय टीमचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पनवेलचे महापौर नितीन पाटील, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उद्योजक अमित ओझे आणि केदार भगत यांनीही दिवाळी विशेषांकाच्या प्रकाशनाबद्दल शुभेच्छा दिल्या. अध्यात्मिक विचारांचा प्रसार, समाजप्रबोधन आणि वैचारिक लेखनाची परंपरा जपण्याच्या ‘सा. रायगड मनोगत’च्या प्रयत्नांचे उपस्थितांनी कौतुक केले.

🔸बाबुभाई रांगोळीवाल्यांकडे थ्री डी रांगोळी आणि ‘रेडिमेड साच्यांना’ ग्राहकांची मोठी पसंती
🛑दिवाळीच्या निमित्ताने जगातील सर्वात उंच इमारत सुंदर रोषणाईने उजळून निघाली

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133