पनवेल दि.४: रंगरचना कला मंच नाट्य संस्था पनवेल मागील अनेक वर्षापासून विद्यार्थी तसेच नाट्यप्रेमी साठी त्यांच्या अभिनय कौशल्याला वाव मिळावे म्हणून प्रयत्न करीत आहे
२२ जानेवारी २०२५ रोजी संस्थेच्या वर्धापन दिनाचा औचित्य साधून एकपात्री अभिनय स्पर्धेचे संस्थेने आयोजन केले असून या स्पर्धेमध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपला रंगमंची अविष्कार अभिनय स्पर्धेतून सादर करावा.
ही स्पर्धा ७ ते १६ या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी व त्यापुढील खुल्या गटासाठी आयोजित केली आहे. असून ७ ते १६ या वयोगटाला ५ मिनिटे व खुल्या गटासाठी ७ मिनिटांचा सादरीकरणाचा कालावधी ठेवण्यात आला आहे ही स्पर्धा विनाशुल्क असून आपल्या शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन आम्ही संस्थेच्या माध्यमातून करीत आहोत
दोन्ही गटातील विजेता प्रथम क्रमांक ₹ ३०००/ ट्रॉफी व प्रशस्तिपत्रक, द्वितीय क्रमांक २०००/ ट्रॉफी प्रशस्तिपत्रक तृतीय क्रमांक ₹ १०००/ ट्रॉफी व प्रशस्तिपत्रक देण्यात येईल. स्पर्धा दिनांक २२ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ३ .०० वाजता काँग्रेस भवन हॉल, महानगर पालिका कार्यालया जवळ घेण्यात येणार आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क : विजय पवार ९२२२१२७४५६
दीपक पवार : ९१५२२१९०३१, राजेंद्र पाटील : ९८६९८२९५५२

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!