दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी मध्ये रंगले सामने
पनवेल दि.८: बहुप्रतीक्षित रोटरी प्रीमियर क्रिकेट लीगच्या पाचव्या हंगामाला सुरू झाली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन कामगार नेते महेंद्र घरत आणि आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते काल करण्यात आले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून खेळाडूंना प्रोत्साहित केले.
टीआयपीएलच्या सौजन्याने तसेच रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे स्पर्धेचे पाचवे वर्ष असून हे क्रिकेट सामने नवीन पनवेल येथील दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीमध्ये 7 ते 9 आणि 14 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत रंगणार आहेत.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, माजी नगरसेवक गणेश कडू तसेच मिलिंद मोहिते, नितीन ढमाळे, सुबोध जोशी, अनिल ठकेकर, अमोद दिवेकर, प्रशिक्षक अमित जाधव, रवींद्र उगरण, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, सिकंदर पाटील, विजू निगडे, संजय बताले, रतन खरोल, अमर म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, रोटरी क्लबचे सदस्य आणि खेळाडू उपस्थित होते.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!