अलिबाग,दि.1 :- महसूल दिनाचे औचित्य साधून तसेच नुकतेच निधन झालेल्या रोहा तहसील कार्यालयातील नायब तहसिलदार संजय नागावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अलिबाग उपविभागीय अधिकारी कार्यालयात तर जिल्ह्यातील इतर उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच तहसील कार्यालयांमध्येहीे रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबीर यशस्वीपणे संपन्न झाले.
या निमित्ताने कराेना विरुद्धच्या युद्धात उत्कृष्ट काम केलेल्या महसूल अधिकारी- कर्मचाऱ्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांची अँटीजेन टेस्टही करण्यात आली.
*पनवेल* तहसील कार्यालयातील 6 जणांनी रक्तदान केले असून 23 जणांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली त्यापैकी 1 जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
*उरण* तहसील कार्यालयातील 30 जणांनी रक्तदान केले असून 56 जणांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली आहे.
*खालापूर* तालुक्यातील 22 जणांनी रक्तदान केले असून 55 जणांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली त्यापैकी 4 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
*कर्जत* तालुक्यातील 13 जणांची अँटीजेन्ट टेस्ट करण्यात आली.
*पेण* तहसील कार्यालयातील 28 जणांनी रक्तदान केले असून 74 जणांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली त्यापैकी 2 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
*अलिबाग व मुरुड* तहसील कार्यालयातील 46 जणांनी रक्तदान केले असून 188 जणांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली त्यापैकी 8 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
*माणगाव* तहसील कार्यालयातील 34 जणांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली त्यापैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
*तळा* तहसील कार्यालयातील 30 जणांची,
*रोहा* तालुक्यातील 68 जणांची,
*श्रीवर्धन* तहसील कार्यालयातील 54 जणांची, तर *म्हसळा* तालुक्यातील 34 जणांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली त्यापैकी 2 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
*महाड* तालुक्यातील 32 जणांनी रक्तदान केले असून 72 जणांची अँटीजेन करण्यात आली त्यापैकी 3 जण पॉझिटिव्ह आले आहेत.
*पोलादपूर* तहसील कार्यालयातील 8 जणांनी रक्तदान केले असून 40 जणांची अँटीजेन करण्यात आली त्यापैकी 3 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. असे आजच्या दिवशी एकूण 176 जणांनी रक्तदान केले असून 747 जणांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली त्यापैकी 24 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
या रक्तदान व आरोग्य शिबिरासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद गवई, आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
महसूल दिनाचे औचित्य आणि राेहा तहसील कार्यालयाचे स्व. नायब तहसिलदार संजय नागावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आज सर्व तहसील कार्यालयांमध्ये रक्तदान शिबिर तसेच आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले हाेते, त्यास सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, तालुका वैद्यकीय अधिकारी, नायब तहसिलदार तसेच इतर कर्मचाऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला.
जिल्हा रुग्णालय रक्तपेढीतर्फे रक्त संक्रमण अधिकारी डॉ.दिपक गोसावी, रक्तपेढी तंत्रज्ञ हेमकांत सोनार, मनिषा नवाळे, जनसंपर्क अधिकारी कुणाल साळवी, अधिपरिचारिका प्रज्ञा पवार, संकेत घरत यांनी रक्तसंकलनाचे काम केले.