पनवेल दि.९: श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ पनवेल, भारतीय जनता पार्टी पनवेल आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा पंधरवडा निमित्ताने खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयात विनामूल्य आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार वाटप महाशिबीर यशस्वीपणे पार पडले. या १५ व्या या महाशिबिरात सर्वसाधारण रोग, बालरोग, महिलांचे आजार, त्वचारोग, हृदयरोग, दंतरोग, हाडांचे रोग, ईसीजी, मधुमेह, नाक-कान-घसा, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, क्षयरोग, कॅन्सर अशा विविध प्रकारच्या तसेच सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या तज्ज्ञांमार्फत करून सल्ला आणि औषधोपचार मोफत करण्यात आले. त्याचबरोबर डोळ्यांची तपासणी व चष्मे वाटप, तसेच अपंगांना तीन चाकी सायकल वाटप, कर्णबधिरांना श्रवणयंत्र वाटप करण्यात आले. यावेळी आयुष्यमान भारत डिजिटल कार्ड, तसेच दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. त्याचबरोबरीने अवयवदानाचे फॉर्म भरण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली होती. उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या महाशिबिराचा ११ हजार ३५२ नागरिकांनी लाभ घेतला. त्यांना मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार देण्याबरोबरच त्यांची भोजन व्यवस्थाही करण्यात आली होती. महाशिबिर यशस्वी करण्यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ पनवेल, भारतीय जनता पार्टी पनवेल आणि रायगड मेडिकल असोसिएशन, तसेच जे. जे. हॉस्पिटल मुंबई, लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट पनवेल, एमजीएम हॉस्पिटल कामोठे व कळंबोली, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल नेरुळ, भारती विद्यापीठ खारघर, मेडिकव्हर हॉस्पिटल खारघर, तेरणा मेडिकल कॉलेज नेरुळ, येरळा मेडिकल ट्रस्ट, साईट फर्स्ट केअर, नायर हॉस्पिटल, व्हिट सेंटर पनवेल, शंकरा आय हॉस्पिटल, सत्य साई संजिवनी हॉस्पिटल खारघर या नामांकित वैद्यकीय संस्थांचे एकूण ५३६ वैद्यकीय तज्ञ् व त्यांचे सहकारी, महाशिबीर यशस्वी करण्यासाठी स्थापित करण्यात आलेल्या ३५ कमिट्यांचे पदाधिकारी सदस्य, कार्यकर्ते, स्वयंसेवकांचे योगदान लाभले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!