पनवेल दि.६: शिवराज्याभिषेक ३५० वे वर्ष व विश्व हिंदू परिषद षष्टीपूर्ती निमित्त विश्व हिंदू परिषद, बजरंग दल पनवेल प्रखंडच्या साथीने आयोजित करण्यात आलेल्या “शिवशौर्य यात्रा”चे पनवेल भाजपच्या वतीने पुष्पवृष्टी, ढोलताशाच्या गजरात आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. या यात्रेची सुरुवात सिंधुदुर्ग येथून झाली असून त्याची सांगता शिवाजी पार्क मुंबई येथे होणार आहे. पनवेलमध्ये शिवशौर्य यात्रेचे आगमन तक्का झाल्यानंतर तिथून भारतीय जनता पार्टी पनवेल कार्यालय – छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुढे रोडपाली, कळंबोली- कामोठे असे मार्गक्रमण करत बाईक रॅली झाली. यावेळी पनवेलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!