पनवेल दि.८: गेल्या ३५ वर्षांपासून सातत्याने कामगारांसाठी लढणारे कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांची न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटना ही कामगारांना खऱ्या अर्थाने न्याय देणारी एकमेव संघटना आहे. कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वात संघटनेच्या माध्यमातून कंपनी व कामगार यांच्यात समतोल राखून पगारवाढीचे करार सातत्याने होत आहेत. मे. एस.एच.एम.शिपकेअर मधील कामगार मे. टिमवर्क सिस्टीम या कंत्राटा अंतर्गत काम करणारे बोटीवरील कामगारांसाठी पगारवाढीचा करार आज करण्यात आला.या करारनाम्यानुसार कामगारांना ९००० ते १५००० पगारवाढ, १९५०० ते ३०००० बोनस, ३२ तासाचा अनुदान म्हणून एक्स्ट्रा पगार, मागील १४ वर्षाची ग्र्युजूईटी मूळ मालक देण्याचे मान्य, तसेच २ लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी, १ लाख रुपयांचा अपघात विमा, इंजिन ड्रायव्हार्सना पी. एफ. सुरु करण्याचे मान्य करण्यात आले आहे. या करारनाम्याच्या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्र घरत, कार्याध्यक्ष पि. के. रामण, कामगार प्रतिनिधी सुनील कोळी, यशवंत कोळी, अनिल कोळी, मोरेश्वर घरत, मितेश पाटील, दिनेश म्हात्रे, सगर घरत, जुबेर मास्टर आदि उपस्थित होते.