माणगाव दि.8: कोकणातील 12 रेल्वेस्थानकांच्या रस्ते काँक्रीटीकरण व सुशोभीकरण कामांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत दूरदृष्यप्रणालीद्वारे भूमिपूजन करण्यात आले. या अनुषंगाने माणगाव रेल्वेस्थानकावर आमदार प्रशांत ठाकूर व इतर मान्यवर उपस्थित होते. या वेळी बोलताना त्यांनी केंद्र व राज्य सरकार हातात हात घालून काम करीत असल्याने विकासाचे इंजिन जोमाने धावेल आणि कोकणातील पर्यटनामुळे उद्योगाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
माणगाव रेल्वेस्थानकावर झालेल्या कार्यक्रमास भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष व माजी आमदार धैर्यशील पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, संपर्कप्रमुख अरुण चाळके, जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रशांत शिंदे, भाजप प्रदेश सचिव रवी मुंढे, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक आनंद यादव, शिवसेना नेते अ‍ॅड. राजीव साबळे, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, तहसीलदार विकास गारुडकडर, माणगाव रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रमेश जैन आदी उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!