पनवेल,दि.22 (संजय कदम) विठोबा खंडप्पा हायस्कूलच्या शतक महोत्सव पुढील महिन्यात मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमाद्वारे साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने आज पनवेल शहरातून सध्या शिकत असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनींसह माजी विद्यार्थी-विद्यार्थीनींनी सहभाग घेवून वाजत गाजत पनवेल शहरातून जनजागृती फेरी काढून पनवेलकरांची मने जिंकली तसेच त्यांना या शतक महोत्सवी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही सुद्धा त्यांनी केले.
कोएसो व्हि.के.हायस्कूल पनवेलला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने आज जनजागृती फेरी काढण्यात आली. या फेरीत शाळेचे आजी व माजी असे मिळून जवळपास हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. सदर फेरी व्ही.के.हायस्कूल, सावरकर चौक, टिळक रोड, जयभारत नाका, कापड बाजार, मिरची गल्ली, शनि मंदिर, पंचरत्न हॉटेल, बिकानेर, शिवाजी चौक, आदर्श लॉज, लाईन आळी, एस.टी.स्टँण्ड, नाडकर्णी हॉस्पिटल ते पुन्हा शाळेत अशी काढण्यात आली.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!