पनवेल दि.२६: श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सहाव्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. नाटय चळवळ वॄद्धींगत करण्यासाठी व नाटय रसिकांना आपले नाटयाविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वॄद्धींगत व्हावा, यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृहनेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी ‘अटल करंडक एकांकीका’ या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे व निटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परिक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाटयरसिकांच्या गळयातील ताईत बनली. या स्पर्धेला मिळत असलेल्या वाढत्या प्रतिसादामुळे आणि कलाकार व रसिकांच्या मागणीमुळे हि स्पर्धा कोकण व मुंबई पुरती मर्यादित न ठेवता राज्यस्तरीय करण्यात आली तसेच बक्षिसांच्या रक्कमेतही भरघोस वाढ करण्यात आली आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी १४ व १५ डिसेंबर २०१९ रोजी निघोजकर मंगल कार्यालय, निघोज, पुणे येथे तर दिनांक १९ ते २२ डिसेंबर २०१९ पर्यंत चांगू काना ठाकूर स्वायत्त महाविद्यालय येथे होणार असून अंतिम फेरी ०३ व ०४ जानेवारी २०२० रोजी पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. अधिक माहितीसाठी शामनाथ पुंडे -९८२१७५८१४७ (प्रमुख कार्यवाह,तथा नियामक मंडळ सदस्य), संकेत मोडक (८४११८४५४४५) गणेश जगताप (९८७०११६९६४), अमोल खेर (९८२०२३३३४९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अशी आहेत पारितोषिके : प्रथम क्रमांक- ०१ लाख रूपये, आणि मानाचा अटल करंडक द्वितीय क्रमांक- ५० हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्हतॄतीय क्रमांक- २५ हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्हचतुर्थ क्रमांक- १० हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्हतसेच सर्वोत्कॄष्ठ दिग्दर्शक/अभिनेता/अभिनेञी/लेखक/संगीत/नेपथ्य/प्रकाश योजना त्याचबरोबर प्राथमिक फेरीतील सर्व विजेत्या संघाना सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.