पनवेल दि.16: पनवेल महानगरपालिकेच्या वतीने बचतगट-व्यावसायिक मेळाव्याचे आयोजन १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८:३० वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत आ.क्रां.वा.ब. फडके नाट्यगृह येथे केले होते. पनवेल महानगरपालिका परीसरातील सुमारे 450 नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेतला. कार्यक्रमासाठी मा उपमहापौर विक्रांत पाटील, उपायुक्त जमीर लेंगरेकर व संजय शिंदे,मा. सभापती संजय भोपी, सहायक आयुक्त श्रीमती तेजस्विनी गलांडे, शहाजी भोसले, माजी सभापती लिना गरड मॅडम व नगरसेविका कुसुम म्हात्रे, कुसुम पाटील, हेमलता म्हात्रे, व नगरसेवक डाॅ.अरूणकुमार भगत उपस्थित होते.
सकाळी 8.30 वाजता नोंदणी सुरू करण्यात आली. डाॅ.संतोष कामेरकर बिझनेस कोच यांनी व्यवसाय नेटवर्किंग कसे करावे याचे मार्गदर्शन केले. विनोद मेस्त्री यांनी व्यवसायाकरिता लाईफ स्किल्स सांगितले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!