पनवेल दि.२७: लोकसंख्येंची प्रचंड घनता असलेल्या आपला देश कुठल्याही प्रकारचा सचोटीने आणि मेहनतीने उद्योगधंदा केल्यास हमखास यश येते. पदवीधर, इंजिनियर होऊन १५ ते २० हजाराची नोकरी करण्यापेक्षा कुठलाही उद्योग अगदी अल्प भांडवलात उभारलात तरीही आपली कमाई किमान २५००० च्या वर जाते. अनुभव व नियोजन करून मेहनत केल्यास हमखास आपण यशस्वी होऊ शकतो, असे अनेक युवकांची उदाहरणे आहेत. एक ते दोन लाखाच्या भांडवलात सुरुवात करून मेहनतीने यशस्वी होऊन कोट्याधीश झालेल आहेत. आताची नवीन पिढी आई वडिलांच्या उत्पन्नावर शिक्षण पूर्ण करतात व आयुष्यभर आई वडिलांच्यावर भार होऊन बसतात. आत्ता नवीन आर्थिक धोरणामुळे कंत्राटी कामगार पद्धतीच्या अल्पपगाराच्या नोकऱ्या व प्रचंड महागाईच्या या जमान्यात नोकरीच्या जीवावर उदरनिर्वाह केवळ अशक्य झालेले आहे. नवीन मुंबईत घर घेणे तर आत्ता दुस्वप्न झालेले आहे आणि म्हणून ज्याच्यात प्रगती नाही केवळ गुलामगिरी आहे त्यापेक्षा आपण परप्रांतीयांचे अवलोकन करा. भाड्याने दुकाने घेऊन व्यवसाय आपल्या भागात येऊन मेहनत करून कोट्याधीश होतात आणि आपण मात्र अल्पसंतुष्ट होऊन वर्षानुवर्षे नोकरीच्या गुलामगिरीत मग्न आहोत. IT मुळे जग हे एक गाव बनलेले आहे. माती विकली तरी लोक कोट्याधीश होत आहेत म्हणून तरुणांनी उद्योगधंद्याची कास धरावी – असे मार्गदर्शन “MG शान सलोन” या दुकानाचे उद्घाटन करताना कामगार, राजकारण, समाजकारण,उद्योग अशा सर्व क्षेत्रात यशस्वी झालेले महेंद्रशेठ घरत यांनी केले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!