पनवेल दि.17: कोरोना काळात हजारो स्थानिक तरुण बेरोजगार होत होते. त्या काळात कामगार नेते महेंद्र घरत हे स्थानिक तरुणांच्या मदतीला धावून आले. त्यावेळी त्यांनी JWR पाडेघर येथील कंपनीत लेबर व सुपरवायझर म्हणून किमान ५०० तरुणांना रोजगार मिळवून दिला. दोन वर्ष काम केल्यानंतर स्वत:हून कंपनीच्या मालकांबरोबर चर्चा करून कामगारांना किमान २००० रुपये ते ५००० रुपये पगार वाढ करण्यात ते यशस्वी झाले आहेत. कामगारांना नोकरी बरोबरच पगारवाढ करून दिल्यामुळे आनंद व्यक्त करत कामगार नेते महेंद्र घरत यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आभार व्यक्त केले. यावेळी शेकडो कामगार उपस्थित होते. कामगारांनी महेंद्र घरत यांचे आभार माणून पुढेही असेच आमच्या पाठीशी उभे रहा अशी अपेक्षा व्यक्त केली.