रायगड दि.11: ढगाळ वातावरणासह राज्यातील काही ठिकाणी आज तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या तर काही ठिकाणी अवकाळीन पावसाने हजेरी लावली.
रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस बरसला. सध्या हिवाळा सुरु आहे. परंतू, हिवाळ्यात पाऊस पडल्याने महाराष्ट्रात एक वेगळेच वातावरण पाहायला मिळाले. या वातावरणामुळे प्रामुख्याने शेतीला फटका बसण्याची चिन्हे आहेत.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आहे. पुढचे एक दोन दिवस हे वातावरण असेच राहिली. या काळात राज्यातील काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी बरसतील. तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळू शकेल असे कुलाबा वेधशाळेने म्हटले आहे.
रायगडसोबतच नाशिक आदी जिल्ह्यांतही अवकाळी पाऊस हजेरी लाऊ शकतो. इतर ठिकाणीही ढगाळ वातावरणासाह रिमझीम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!