पनवेल दि.२७ (संजय कदम) : पनवेल वाहतूक शाखेतील रात्रपाळी करिता कर्तव्यावर असणारे पोलिस अंमलदार पोलीस हवालदार युवराज येळे व पोलीस हवालदार अमीर मुलाणी यांनी महिला कार चालकाला मदतीचा हात दिला आहे.
हे दोघे जण पनवेल ते जेएनपीटी रोडवर रात्रपाळी दरम्यान अवैधरित्या मुख्य रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनावर कारवाई करत असताना अटल सेतू ते पुण्याकडे जात असताना पनवेल टी पॉइंट येथे मध्यरात्री एक कार चालक महिलेचे अचानक टायर फुटल्याने तेथे गस्तीवर असणारे अंमलदार यांनी तिथे एकटीच महिला कार बंद करून मुख्य रस्त्यावर भीतीदायक स्थितीमध्ये कारमध्येच बसून राहिली असल्याचे पहिले. यावेळी या दोघांनी माणुसकी दाखवून स्वतःच्या गाडीमधील व साहित्याने सदर टायर बाजूला करून स्टेफनी लावून गाडीचे चाक बदलून दिले व सदर महिलेस इच्छित स्थळी रवाना केली. महिलेस मदतीचा हात देऊन माणुसकी दाखवली व वाहतूक शाखेची जन माणसात प्रतिष्ठा वाढवल्याने सर्व नागरिकांमध्ये अभिनंदन वर्षाव होत आहे.

🛑पनवेल कल्चरल सेंटरला देणगी स्वरूपात संगणक संच भेट !

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!