अलिबाग, दि.12 :- पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आज रोहा तालुक्यातील कोकण कृषी विद्यापीठाचे कृषी महाविद्यालय, किल्ला येथे नव्याने कोविड सेंटर उभे करण्यासाठी कोणकोणत्या आवश्यक सोयीसुविधांची गरज आहे व तेथे कोविड रुग्णांसाठी अधिक उत्तम व्यवस्था कशा पध्दतीने करता येईल, याची पाहणी करून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी प्रांताधिकारी डॉ.यशवंत माने, तहसिलदार कविता जाधव, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राे.डॉ. पुजारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभय ससाणे, सहाय्यक गटविकास अधिकारी राठोड उपस्थित होते.