आपण ग्रेट’ असा शब्द कुणासाठी वापरतो. जे व्यक्तिमत्त्व फक्त नावाने मोठे नसते, तर कर्माने मोठे असते. एखादा माणूस, त्यांच्यातले गुण, त्यांचा स्वभाव यांचा जवळून अनुभव घेतल्यानंतरच आपण त्याला
ग्रेट’ म्हणू शकतो.
पत्रकारितेत असल्यामुळे गेली १७ वर्षे मी राजकारण खूप जवळून पाहिले, अनेक राजकारणी तर कार्यकर्त्याला आणि आपल्या सहकाऱ्यांना काम झालं की “युज अँड थ्रो” करतात.
मात्र याला महेंद्रशेठ घरत हे अपवाद आहेत. कामगार क्षेत्र झाल्यानंतर लवकरच या क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करणारे, राजकारणात असूनही पक्षविरहित राजकारण करनारा, जाती-पंथ असा भेद त्यांच्याकडे नसतो. त्यांच्याकडे असणारा प्रत्येक सहकारी किंवा कार्यकर्ता असो त्याची ते विचारणा करत असतातच, महेंद्र शेठ घरत यांचे त्यांच्या आई-वडिलांवर खूप प्रेम होते. आई-वडिलांची त्यांनी खूप सेवा केली. त्यामुळेच जो आई-वडिलांची सेवा करतो त्यांच्यावर तर त्यांचे विशेष प्रेम असते.फोडीले भांडार, धन्याचा तो माल, मी तो हमाल भारवाही’ हे संत तुकोबा महाराजांनी लिहिलेले अभंग त्यांच्या तोंडी असतो. आणि ते फक्त बोलत नाहीत तर ते त्याप्रमाणे आचरणात आणतात आणि म्हणूनच या माणसाला जीवन जगण्याचा अर्थ कळला. एखाद्याला मदत केली तरी त्याच्याकडून अपेक्षा ठेवायच्या नाहीत. कर्म करत राहायचे, पुढे जायचे, थांबायचे नाही, जो थांबला तो संपला. मला आठवतेय त्यांना एक मोबाईलवर कॉल आला. त्यामध्ये त्या माणसाने आजारपणासाठी मदत मागितली. मला आठवते त्यांची आई हॉस्पिटलमध्ये होती आणि तिच्या उपचारासाठी त्यांना आर्थिक मदत हवी होती. हे ऐकून महेंद्रशेठ यांनी अशावेळी लगेच त्यांच्या एका सहकाऱ्याला फोन करून सांगितले, की अरे ते साहित्य आणणार होतास ना ते आणू नको, रद्द कर आणि ते पैसे हॉस्पिटलमध्ये नेऊन त्या माणसाला दे... खरंच कोणी इतका विचार करू शकतो का? एखादा अडचणीत असेल तर महेंद्रशेठ यांना झोप लागत नाही, त्यांच्या तोंडून कायम वाक्य येते, की स्वतःची १० घरे असण्यापेक्षा दुसऱ्यांची घरे झालेली मला बघायला आवडतील आणि त्यामुळे मी अनेकांना मदत करत असतो... त्यामुळेच महेंद्रशेठ घरत हे अनेकांसाठी देवदूतच ठरले आहेत. आई-वडिलांची आणि गुरुजनांची सेवा करणे हाच खरा धर्म आहे. देवावर त्यांची खूप श्रद्धा असल्यामुळे त्यांनी खूप तीर्थक्षेत्र केली. मात्र तरीही न चुकता ते त्यांना शिकवणाऱ्या माध्यमिक शाळेतील शिक्षकांना गुरुजनांना भेटण्यासाठी सातारा येथे जात असतात, आज त्यांचे शिक्षक वयोवृद्ध झाले आहेत, तरी त्यांची येण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. गुरू आणि शिष्याचे नाते असे असते, ते मला मागच्या वेळी अनुभवायला मिळाले. महेंद्र घरत साहेबांना हायस्कूलमध्ये शिकवणारे गोरड सर होते. त्यांना आज वृद्धतामुळे धड व्यवस्थित चालता येत नाही. मात्र आपला शिष्य आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलून आले आणि ते ताजेतवाने झाले.
माझ्या अपेक्षा तू पूर्ण केल्यास’ असे म्हटल्यावर एका शिष्याला आणखी काय हवे. गोरड सर हे कायम घरत साहेबांचे स्टेटस पाहत असतात. त्यामुळे त्यांच्या दररोजच्या घडामोडी त्यांना समजत असतात.
या कलयुगातही एक महान दाता आहे. या युगातील कर्णच म्हणावे लागेल… ते दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणजे कामगार नेते तथा काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत साहेब होय.
स्वतःच्या वाट्याला आलेला वडिलोपार्जित हिस्सा म्हणून मिळालेल्या वन बीएचके आणि टू बीएचके फ्लॅट त्यांनी दान करून टाकला…. मित्रांनो, साधी गोष्ट नाही ही… इथे एक इंच जमीन सोडायला भाऊ भावाला तयार नाहीत. तिथे हा एक अफलातून असलेला माणूस असेच देऊन टाकतो, कोणतीही अपेक्षा न ठेवता. त्यामुळेच महेंद्र घरत हे असाधारण व्यक्तिमत्त्व आहेत… म्हणूनच ग्रेट’ हा शब्द इथे वापरता येईल. माझ्या फोटोग्राफीवर प्रचंड प्रेम करणारे म्हणून महेंद्रशेठ घरत साहेबांचे नाव मी कायम घेत असतो. मी २०२३ मध्ये खूप काही गमावले. नोकरी गेली, त्यानंतर वडील गेले, भावासारखा साथ देणारा मित्र गेला. मानसिक खूप खचलो होतो. अशा परिस्थितीमध्ये जो आधार देतो तोच आपल्यासाठी देव ठरतो. आमच्यासाठी ती व्यक्ती महेंद्र घरत साहेब आहेत. आता तू तुझा स्वतःचा व्यवसाय सुरू कर... इतके बोलूनच ते थांबले नाहीत, तर स्वखर्चाने उलवे नोड येथे मला फोटो स्टुडिओ काढून दिला... गाव लांब असल्याने आणि मुलीचे शिक्षण व्हावे म्हणून माझी होत असलेली धावपळ पाहता त्यांनी मला एका मोठ्या टॉवरमध्ये वन बीएचके सुसज्ज फ्लॅट मोफत दिला. माझी एवढी काळजी घेणारा कलयुगात कुणीतरी आहे, यामुळेच मी खूप समाधानी आणि आज सुखीही आहे. याचे सारे श्रेय फक्त आणि फक्त महेंद्रशेठ घरत यांचेच आहे, हे मी अभिमानाने सांगतो. फक्त मलाच नाही तर घरत साहेबांनी ज्यांना ज्यांना मदत केली आहे ती यादी मारुतीच्या शेपटीप्रमाणे खूप लांब आहे. जात, पात, धर्मविरहित मदतीचा हात देणाऱ्या या
ग्रेट’ माणसाला निरोगी दीर्घायुष्य लाभू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.