पनवेल दि.१७: तळोजा एमआयडीसी मधील काही दुकाने, गॅरेज व काही कार्यालयांवर अतिक्रमण विरोधी तोडू कारवाई करण्यात येणार आहे. या संदर्भात भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत व सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन चर्चा केली. या वेळी तोड कारवाई करण्यापूर्वी स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे व्यावसायिक पुनर्वसन करून रोजगार उपलब्ध करुन द्यावा, अशी आग्रही मागणी प्रभाग क्रमांक २ भाजपच्यावतीने करण्यात आली.