रत्नागिरी दि .8 (सुनिल नलावडे) जिल्हयात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता जिल्हा आरोग्य यंत्रणा तुटपुंजी असूनही जिल्हा रुग्णालयात उत्तम प्रकारचे उपचार करोना बाधीत रुग्णावर केले जातात हे आज पुन्हा सिद्ध झाले. जिल्हा रुग्णालयातील अपूरे डॉक्टर ,तंत्रज्ञ , तज्ञ परिचारीकांची भासत असलेली कमतरता तरीही दिवस – रात्र आरोग्य सेवा बजावत करोना बाधीत रुग्णासह अन्य प्रकारच्या उपचारांसाठी आलेल्या सर्व रुग्णांवर उपचार केले जातात ही रत्नागिरी रुग्णालयाची किमया आहे.
मंगळवार दि.७ रोजी जिल्हा रुग्णालयात सकाळी ११ वाजता २ करोना बाधीत माता व त्यांची बालके यांना १० व्या दिवशी करोना मुक्त करून रुग्णालयातून सोडण्यात आले त्यांचे रुग्णालया बाहेर सर्व आरोग्य कर्मचारी , उपचार करणारे बालरोग तज्ञ डॉ. दिलीप मोरे , आरोग्य कर्मचारी , सामाजीक संस्थांनची मंडळी यांनी त्यांचे स्वागत करून निरोप दिला.
आता पर्यंत जिल्हा रुग्णालयात ९१ नवजात बालकांची करोना चाचणी घेण्यात आली होती. त्यापैकी ३१ नवजात बालकांचा करोना बाधीत अहवाल प्राप्त झाला. त्या सर्व बालकांवर जिल्हा रुग्णालयाचे प्रख्यात बालरोग तज्ञ डॉ. दिलीप मोरे त्यांच्या सहकारी वैद्यकीय पथकाने उपचार करत बाळासह आईला करोना मुक्त करण्याची यशस्वी कामगीरी पार पाडली व सर्व रुग्णांना घरी सोडण्यात आले. जिल्हा रुग्णालयाच्या या कामगीरीची दखल जिल्हावासीयानी घेतली असून वैदयकीय क्षेत्रातील तज्ञांकडून कौतुक करण्यात आले.
स्तनपान चालू ठेवत उपचार केल्यामुळे आई व बाळाची इम्युनीटी पावर चांगली राहते त्यामुळे करोना बाधीत विषाणु निष्तेज होऊन नवजात बालक व माता बरी होते असा अनुभव असल्याचे मत बालरोग तज्ञ डॉ. दिलीपमोरे यांनी व्यक्त करून अशाप्रकारची उपचार पद्धती यापूर्वी सुद्धा यशस्वी रित्या पार पाडल्याचे भावनीक होत सांगितले.
आपण जिल्हा रुग्णालयात करोना बाधीत माता व बालकांवर यशस्वी उपचार करण्यामागे पाठबळ दिलेल्या उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत ,जिल्हाधीकारी , सिव्हील सर्जन , सहकारी डॉक्टर यांच्या विश्वासातूनच यशस्वी उपचार करू शकलो अशा भावना व्यक्त केल्या.