पनवेल दि.3: कोरोना (कोविड १९) विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या म्हणजे शनिवारी (दि. ०४ जुलै) पनवेलला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा व उपाययोजना संदर्भात रुग्णालय व महापालिका प्रशासनाशी चर्चा करणार आहेत.
पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ आहेत. दरदिवशी किमान १०० हुन अधिक जणांना कोरोना विषाणूची लागण होऊन रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच आता ग्रामिण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. हि अत्यंत चिंतेची बाब आहे. त्या अनुषंगाने पनवेल उपजिल्हा रुग्णालय आणि महानगरपालिका प्रशासनाकडून काय उपचार आणि उपाययोजना केल्या जात आहेत, याचा आढावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस घेणार असून त्या संदर्भात चर्चा करणार आहेत. ते सकाळी १०. ३० वाजता पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालय, त्यानंतर सकाळी ११.३० वाजता पनवेल महापालिकेत आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याशी संवाद साधणार आहेत.