पनवेल दि.१३: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान शासनाकडून “हर घर तिरंगा’’ अभियान देशात राबविले जात आहे. या कालावधीत प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्यासाठी नागरिकामध्ये जनजागृती व्हावी यासाठी आज खारघर भारतीय जनता पार्टीकडून प्रभात फेरी काढण्यात आली.
खारघर सेक्टर 7 मधील बिकानेर पासून पदयात्रेला सुरुवात झाली. बँक ऑफ इंडिया, नवरंग चौक, गोखले शाळा, शिवाजी चौक, गावदेवी मैदान, खारघर गाव ते भाजप पक्ष कार्यालय ह्या मार्गाने प्रभात फेरी निघाली.
यावेळी खारघर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल म्हणाले की, हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून घराघरावर तिरंगा ध्वज फडकवण्यासाठी नागरिकांनी या महोत्सवात सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रभात फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. हे अभियान यशस्वी करण्यासाठी संयोजक प्रभाकर बांगर, लखवीर सिंग सैनी, अनिल साबणे,अश्विनी भुवड, आशा शेडगे, अंकिता वारंग व प्रिया दळवी यांनी विशेष मेहनत घेतली.
भारतीय जनता पार्टी,खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, स्थायी समिती सभापती अॅड नरेश ठाकूर, महिला व बाल कल्याण सभापति सौ हर्षदा उपाध्याय, नगरसेवक प्रवीण पाटील,नगरसेवक निलेश बाविस्कर, नगरसेवक शत्रुघ्न काकडे, सरचिटणीस दीपक शिंदे, उपाध्यक्ष दिलीप जाधव, जिल्हा चिटणीस गीता चौधरी, मंडल उपाध्यक्षा बिना गोगरी, रमेश खडकर, युवा मोर्चा सरचिटणीस अमर उपाध्याय, जिल्हा उपाध्यक्षा संध्या शारबिद्रे,माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर, सरचिटणीस साधना पवार, महिला मोर्चा उपाध्यक्षा प्रतीक्षा कदम, सीमा खडकर, कांचन बिरला,स्मिता आचार्य, सुशीला शर्मा, ज्येष्ठ नागरिक सेलचे संयोजक नवनीत मारू, विजय भोसले, आदिनाथ पाटील, संजय शर्मा, आनंद मोकाशी,ज्येष्ठ नेते गिरीश गुप्ता,उत्तर भारतीय सेल सह संयोजक शैलेन्द्र त्रिपाठी,पूर्व सैनिक सेल चे संयोजक गजेसिंह, सुरेशकुमार, विजय बागडे, नदीम उपस्थित होते.