अलिबाग,दि.30 : भारत निवडणूक आयोग व मा.मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या निर्देशानुसार 01 जानेवारी, 2022 या अर्हता आधारित छायाचित्रासह मतदारयादीचा विशेष पुनर्रिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
या कार्यक्रमानुसार मा.भारत निवडणूक आयोगाकडून विकसित करण्यात आलेल्या Voter Helpline App (VHA) या अॅप सर्व नागरिक/मतदारांसाठी अतिशय उपयुक्त आहे. हे अॅप Play store (Android)/App store (iOS) मधून download करून घेऊ शकतो. प्रथम रजिस्ट्रेशन करुन log in करता येते.
या ॲप मध्ये पुढीलप्रमाणे सुविधा प्राप्त आहेत :- नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी तसेच पहिल्या वेळी मतदार म्हणून किंवा इतर मतदारसंघातून स्थलांतरीत झाल्यामुळे मतदारयादीत नाव समाविष्ट करावयाचा असल्यास त्याबाबत फॉर्म नं.6 भरता येईल, फॉर्म न.7 व्दारे इतर व्यक्तींचे नाव समाविष्ट करण्याबद्दल आक्षेप घेण्यासाठी स्वत:चे नाव किंवा इतर कोणत्याही व्यक्तीचे नाव/मृत्यू, स्थलांतरीत झाल्याने त्या मतदारांचे नाव वगळणी करता येईल, फॉर्म नं 8 द्वारे मतदारयादीतील मतदाराच्या तपशिलामध्ये बदल/दुरुस्ती करता येईल, ज्या मतदारांचा एकाच विधानसभा मतदारसंघातील यादीभागात नाव स्थलांतरीत करावयाचे असल्यास फॉर्म नं. 8 अ भरुन बदल करता येईल.
भारत निवडणूक आयोगाने विकसित करण्यात आलेल्या Voter Helpline App (VHA) सर्व नागरिकांनी/मतदारांनी download करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर तसेच उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे यांनी केले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!