कळंबोली दि.१२: विधानसभेच्या रणधुमाळीत महायुती आघाडीचे पनवेल विधानसभा क्षेत्रातील उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी त्यांच्या सौभाग्यवती वर्षा ठाकूर यां ही रणांगणामध्ये दाखल झाल्या आहेत. त्यांच्या प्रचाराला कळंबोली वसाहतीसह अन्य भागातून मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कळंबोलीतील गुरुविला सोसायटीमध्ये झालेल्या प्रचार रॅलीत नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे फटाक्याच्या आतषबाजीत भव्य स्वागत करून पुन्हा एकच वादा फिर से प्रशांत दादा चा नारा मतदारांनी दिला आहे.
विधानसभेच्या प्रचाराच्या रणधुमाळी आता शिगेला पोहोचला आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी आता त्यांच्या पत्नी वर्षा ठाकूर व त्यांच्या वहिनी म्हणजेच परेश ठाकूर यांच्या पत्नी अर्चना ठाकूर याही प्रचाराच्या रणधुमाळी मध्ये सहभागी झाल्या आहेत. वर्षा ठाकूर स्वतः प्रचाराची धुरा सांभाळत असून कळंबोलीतील विविध हौसिंग सोसायटी मधून प्रचार करून पुन्हा प्रशांत ठाकूर यांना शंभर टक्के मतदान करून आमदार करण्यासाठी विनंती करत आहेत. सोमवारी सायंकाळी झालेल्या प्रचार रॅलीत मोठ्या संख्येने मतदारांनी सहभाग घेऊन पुन्हा एकच वादा आमचा हक्काचा प्रशांत दादा असाच नारा घेऊन त्यांना निवडून आणण्याची हमी मतदारांनी दिली आहे. यावेळी त्यांच्या समवेत माजी नगरसेवक बबन मुकादम, फटके विमुक्त जाती-जमाती सेलचे प्रमुख बबन बारगजे, महिला आघाडी प्रमुख बाईजा बारगजे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रिया मुकादम, सोसायटीचे अध्यक्ष जगदीश पाटील, सचिव उमाकांत गव्हाणे, तसेच सदस्य गहीनाथ धुमाळ, अशोक भोसले सह मोठ्या संख्येने सोसायटीतील सदस्य सहभागी झाले होते. यावेळी बोलताना वर्षा ठाकूर यांनी सोसायटी व कळंबोली वसाहती मधील नागरी प्रश्न धसास लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून कळंबोलीच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी एकच वादा प्रशांत दादा चार नाऱ्याने परिसर दुमदुमून गेला.